‘कोणाशी पंगा घ्या, माझ्याशी घेऊ नका, त्या 52 आमदारांना पाडले होते’, शरद पवार यांचा बंडखोरांना थेट इशारा

Sharad Pawar Election Rally: पक्षात बंडखोरी झाल्यानंतर मी शांत राहिला. त्यानंतर मी संपूर्ण राज्यातील जनतेशी पुन्हा संपर्क सुरु केला. तीन वर्ष कठोर मेहनत केली. पुढील निवडणुकीत त्या 52 आमदारांविरोधात युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. मला ज्यांनी सोडले ते 52 च्या 52 आमदार पराभूत झाले.

'कोणाशी पंगा घ्या, माझ्याशी घेऊ नका, त्या 52 आमदारांना पाडले होते', शरद पवार यांचा बंडखोरांना थेट इशारा
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:37 AM

Sharad Pawar Election Rally: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थांबणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच बडे नेते सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवार यांनी राज्य पिंजून काढला आहे. वयाच्या 83 व्या वर्षी ते सर्वत्र सभा घेत आहेत. आता सोलापूरमधील माढामध्ये शरद पवार यांनी रविवारी सभा घेतली. या सभेत त्यांनी पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या सर्व आमदारांना थेट इशारा दिला. तसेच 1980 मध्ये काय झाले होते, त्याची आठवण करुन देत ‘कोणाशी पंगा घ्या, माझ्याशी घेऊ नका, त्या 52 आमदारांना पाडले होते’, असा हल्ला केला.

प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी बंडखोरांना पाच दशकापूर्वीच्या प्रकरणाची आठवण करुन दिली. पाच वर्षांपूर्वी पक्षात बंडखोरी झाली होती. शरद पवार यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यकर्त्यांची उभारणी करत ज्या आमदारांनी बंडखोरी केली होती, त्यांना पराभूत केले.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, 1980 मधील निवडणुकीत आमच्या पक्षाचे 58 आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता झाला होता. मी विदेशात गेलो होतो. विदेशातून परत आल्यावर मला समजले तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी चमत्कार केला. आमच्या पक्षातील 58 पैकी 52 आमदार त्यांनी फोडले होते. मला विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले.

हे सुद्धा वाचा

शरद पवार पुढे म्हणाले, मी त्यावेळी शांत राहिला. मी संपूर्ण राज्यातील जनतेशी पुन्हा संपर्क सुरु केला. तीन वर्ष कठोर मेहनत केली. पुढील निवडणुकीत त्या 52 आमदारांविरोधात युवा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. मला ज्यांनी सोडले ते 52 च्या 52 आमदार पराभूत झाले. मला महाराष्ट्रातील जनतेवर अभिमान आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. एकाप्रकारे शरद पवार यांनी अजित पवार गटातील बंडखोरी करणाऱ्या आमदारांना थेट इशाराच या प्रकरणातून दिला आहे.

83 वर्षीय पवार म्हणाले, ज्या लोकांनी विश्वासघात केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवावी लागणार आहे. त्यांना केवळ पराभूत करायचे नाही तर त्यांचा दारुन पराभव करायचा आहे. त्यांनी कोणाशी पंगा घ्यावा, माझ्याशी पंगा घेऊ नये.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.