शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली ‘ही’ विनंती

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली आहे.

शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली 'ही' विनंती
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 7:19 PM

मोठी बातमी समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली आहे. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे. शरद पवार हे  या साहित्य संमेलनाचे स्वगत अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती पत्राद्वारे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दिल्लीत साहित्य संमेलन 

यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे.  २१ ते २३ फेब्रुवारी  दरम्यान या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन विशेष असणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे शरद पवार यांच्या पत्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान दुसरीकडे आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिटं चर्चा झाली. मात्र ही चर्चा कशावर झाली? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.  शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.