NCP Ajit Pawar | अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले? जाणून घ्या

NCP Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे.

NCP Ajit Pawar | अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले? जाणून घ्या
ncp rajbhavan
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 6:10 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

शरद पवारांचे निकटवर्तीय अजित पवारांसोबत

सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना मंत्रीपद दिलं. पण ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नरहरी झिरवळ चर्चेत होते. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

हसन मुश्रीफ

अनिल भाईदास पाटील

आदिती तटकरे

संजय बनसोडे

बाबूराव अत्राम

अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित आमदार

दिलीप वळसे पाटील

छगन भुजबळ

हसन मुश्रीफ

किरण लहमाटे

सरोज अहिरे

अशोक पवार

अनिल पाटील

सुनिल टिंगरे

अमोल मिटकरी दौलत दरोडा

अनुल बेणके

रामराजे निंबाळकर

धनंजय मुंडे

निलेश लंके

मकरंद पाटील

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.