NCP | Ajit Pawar यांची महाविकास आघाडीतून एक्झिट, पडद्यामागे काय घडत होतं? Timeline
NCP Ajit Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन आठवड्यांपूर्वी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच कार्याध्यक्ष बनवलं होतं. त्यातले प्रफुल पटेल हे अजित पवारांसोबत आहेत.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही पक्षातून बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन आठवड्यांपूर्वी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच कार्याध्यक्ष बनवलं होतं. त्यातले प्रफुल पटेल हे अजित पवारांसोबत आहेत.
राजभवनावर शपथविधी सोहळा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार आज शपथ घेत आहेत. अजित पवार यांना 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात एकूण 54 आमदार आहेत. मागच्या तीन वर्षात अजित पवार यांनी तीनवेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या टाइमलाइनवर एकदा नजर मारुया.
ऑक्टोबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण हे सरकार तीनच दिवस टिकलं. कारण पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा अजित पवारांना पाठिंबा नव्हता. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून महाविकास आघाडीच सरकार स्थापन केलं.
2019 ते 2022 या तीन वर्षात महाविकास आघाडीकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार कोसळलं.
2022-2023 एकनाथ शिंदे-फडणवीस यांच सरकार आल्यानंतर अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते बनले.
एप्रिल 2023 मध्ये अजित पवार भाजपा-शिंदेंसोबत जाणार अशी चर्चा होती. अजित पवार पक्षाच्या अनेक कार्यक्रमान अनुपस्थित राहिले. या दरम्यान अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं. पण ते राष्ट्रवादी सोडणार नसल्याच संकेत देत होते.
मे 2023 मध्ये शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडत असल्याच जाहीर केलं. त्यावेळी अजित पवार यांची पक्षाध्यक्षपदासाठी चर्चा होती. पण काही दिवसातच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.
जून 2023 मध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना पक्षाच कार्याध्यक्ष बनवलं. अजित पवार यांना कुठलही संघटनात्मक पद दिलं नाही. त्यांना प्रदेशाध्यक्षपद देणार अशी चर्चा होती.
2 जुलै 2023 म्हणजे आज अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली,