जागा जाहीर होण्याआधीच शेकापचे उमेदवार जाहीर, महाविकास आघाडीला झटका? पडद्याआड काय घडतंय?

शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) महाविकास आघाडीतील जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. जयंत पाटील यांनी हे उमेदवार जाहीर केले असून, त्यांनी आघाडी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकरे गट आणि शेकाप यांच्यात सांगोला मतदारसंघासाठी वाद निर्माण झाला आहे. शेकापने या जागेसाठी स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे. ही घोषणा जागावाटपाच्या अंतिम निर्णयापूर्वी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जागा जाहीर होण्याआधीच शेकापचे उमेदवार जाहीर, महाविकास आघाडीला झटका? पडद्याआड काय घडतंय?
महाविकास आघाडी
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 8:08 PM

महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तणाव पाहायला मिळाला. हा तणाव आता मिटला असून जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अंतिम जागावाटप जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांच्याकडून आतापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आपण महाविकास आघाडी सोडणार नाही, असं देखील स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.

“आम्ही प्रागतिक आघाडी म्हणून लढतो आहोत. आम्ही आघाडीतून बाहेर जातो, अशी चर्चा आहे. पण त्या प्रकारची कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नाहीत. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात शेकापचे आमदार काम करणार आहेत”, असं जयंत पाटील यांनी जाहीर केलं. यावेळी जयंत पाटील यांनी अलिबाग मतदारसंघासाठी चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर पनवेल मतदारसंघातून बाळाराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच उरणमधून प्रितम पाटील, पेणमधूल अतुल म्हात्रे आणि लोहा कंधार येथून शामसुंदर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.

सांगोला मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा

विशेष म्हणजे ठाकरे गट दावा करत असलेल्या सांगोला मतदारसंघासाठी देखील शेकापकडून उमेदावाराची घोषणा करण्यात आली आहे. शेकापकडून सांगोला मतदारसंघासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगोल्यातील माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मविआत उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गट दीपक साळुंखे यांना उमेदवारी देऊ इच्छुक आहे. तर शेकापदेखील या जागेसाठी आग्रही आहे. तसेच शेकापने बाबासाहेब देखमुख यांची उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

‘हे रडगाणं 4 तारखेपर्यंत चालू रहाणार’

दरम्यान, “आमची दोन-तीन उमेदवारांची मागणी आहे. पण आम्ही मविआत बंड करणार नाही. महाराष्ट्रातील वातावरण आज युतीच्या विरोधात आहे. त्याला गालबोट लावणारं कृत्य आमच्याकडून होणार नाही. शरद पवारांनी सांगितलं की, मी स्वतः शेकापसोबत आहे. त्यामुळे शेकापला जागा मिळणार. हे रडगाणं 4 तारखेपर्यंत चालू रहाणार”, अशीदेखील प्रकिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.