मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग, भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय?

मनसे-भाजप युतीबाबत हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडवर शिंदे गटाची भूमिका काय आहे? याबाबत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय.

मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग, भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय?
mns mahayuti
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 8:16 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची आज ही दुसरी दिल्लीवारी आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा सध्या दिल्लीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांची आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मनसे-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची चिन्हं आहेत. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर, शिवसेना नेते संजय शिरसाट आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

“मला मनसे आणि भाजपची युती झाली तर निश्चितच आनंद होईल. कारण शेवटी काही दिवसांपूर्वी राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. राज ठाकरे आणि आमच्या पक्षाने हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. आमच्या विचारधारा मिळत्याजुळत्या आहेत. त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. उद्धव ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कातून बोलत असताना तमाम हिंदू, बंधू, मातांनो हे शब्द गुंडाळले आणि देशभक्त, राष्ट्रभक्त अशा प्रकारचे शब्द वापरत हिंदुत्वाची भूमिका घेणं टाळलं. अशा वेळेला राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान व्हावं म्हणून एकत्र येत असतील तर त्यांचं निश्चितच स्वागत होऊ शकतं”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

“दिल्लीला युतीसाठी गेले असतील तर अंतिम चर्चा होऊ शकते. कारण पक्षाचा अंतिम निर्णय हा दिल्लीतच होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत चर्चा करुन महत्त्वाचे निर्णय घेत असतात. हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे व्यापक दृष्टीकोनाने येत असतील तर त्यांचं स्वागत आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“राज ठाकरे यांना आम्ही आधीच आवाहन केलं होतं की, त्यांनी आमच्या महायुतीत यावं. आमच्या हिंदुत्वाची भूमिका सारखी आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. या निमित्ताने आम्हाला आणि त्यांना चांगला मार्ग निघेल. आताच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार येणं कठीण आहे. त्यामुळे कोणत्याही एका युतीचं सरकार येणार आहे. महायुतीत सहभागी झाल्याने पक्षाला, कार्यकर्त्यांना उभारी मिळते. तसेच सत्तेत सहभागही होतो. राज ठाकरे हाच दृष्टीकोन डोळ्यांसमोर घेऊन आज दिल्लीला गेले असावेत. मनसे-भाजप युतीची गोड बातमी आली तर आम्हाला आनंदच आहे. जागावाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. त्यात काहीच अडचण नाही. राज ठाकरेंना आधी महायुतीत येऊद्या. मग त्यांच्या मागणीबद्दल नंतर ठरवलं जाईल”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

मनसे नेते प्रकाश महाजन काय म्हणाले?

“मनसे-भाजप युती होऊ शकते, असं प्रकाश महाजन म्हणाले. स्वत: राज ठाकरे पुढाकार घेऊन दिल्लीला गेले असतील तर निश्चितच चांगला निर्णय होईल. आता याबाबत सर्वस्व राज ठाकरे उत्तर देऊ शकतात. आम्ही कार्यकर्ते आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.