आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाच्या नेत्याचे आव्हान. म्हणाले ‘ठाण्यातून उभे राहा. डिपॉझीट वाचवून दाखवा’
शिवसेना नेते (ठाकरे गट) आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते जिंकले मात्र, त्यासाठी त्यांना विधान परिषदेत दोन दोन आमदार द्यावे लागले. दोन आमदारांच्या बदल्यात आदित्य ठाकरे यांनी एक आमदारकी मिळाली.
सिंधुदुर्ग : 24 सप्टेंबर 2023 | महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा कारभार होता. अर्थमंत्री म्हणून अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देतात अशी तक्रार शिवसेना आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही वेगळी भूमिका घेतली असे शिंदे गट सातत्याने सांगत होत. मात्र, तेच अजित पवार आता त्यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाच्या भूमिकेत आता बदल झाला आहे. अजित पवार यांच्याकडे कार्यक्षमपणे काम करण्याची शक्ती आहे असे शिंदे गटाचे मंत्री म्हणले आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केलीय.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी शिवसेनेचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित असा वरळी हा मतदारसंघ निवडण्यात आला. विद्यामान आमदार सुनील शिंदे आणि राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आले सचिन अहिर या दोन्ही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्याची जबाबदरी घेतली होती. नेमकी हीच बाब हेरून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठकारे यांच्यावर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवा. तुम्ही वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान दिले आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी ‘आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात ठाण्यातून उभे राहून आणि डिपॉझीट वाचवून दाखवावे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, असे म्हटलंय.
ठाण्यातून निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवा
‘तुम्हाला वरळीतून लढायला दोन दोन mlc द्यावे लागले तेव्हा तुम्ही आमदार झालात. तुम्ही राजपुत्राच्या भुमिकेत असता. ते तुम्ही रहा. आमचं अजिबात दुमत नाही. मात्र, हाडाच्या कार्यकर्त्यांना दुखवू नका. त्याच्या मेहनतीला कमी लेखू नका, अशा शब्दात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना ठाण्यातून निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवण्याचे आव्हान दिलंय.
अजित पवार यांच्याकडे कार्यक्षम शक्ती
मी राष्ट्रवादी पक्षाचा आमदार होतो. त्यामुळे अजित दादा यांच्या कामाचा मला अनुभव आहे. एकेकाळचे पक्षातील ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत. कुठली मंत्रिपद कोणाकडे राहावीत हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची मला माहिती नाही. मात्र, अजित पवार यांचे मंत्रीपद बदलले जाईल असे मला वाटत नाही. त्यांच्याकडे कार्यक्षमपणे काम करण्याची शक्ती आहे. ती महाराष्ट्राच्या हितासाठी वापरली जावी ही आमची अपेक्षा आहे, असे केसरकर म्हणाले.