शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर मोक्काची कारवाई करण्याची मागणी कुणी केली? संतोष बांगर यांचं प्रकरण नेमकं काय ?
प्राचार्यांना मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर मोक्काची कारवाई करून अटक करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरुन आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते एका प्राचार्याला मारहाण करत आहे. बांगर विधीमंडळात सदस्य आहे त्यांनी कायद्याचे रक्षण करायला हवे पण रक्षण करणारेच खुलेआम कायदा तोंडात असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालत असेल तर तात्काळ संतोष बांगर यांच्यावर मोक्का लावून अटक करावी अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला ही मागणी करीत असल्याचे सचिन खरात म्हणाले आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नहेमीच कुठल्या ना कुठल्या वादात सापडतात, अधिकाऱ्यांना फोन करून अर्वाच्च भाषा वापरणे.
त्यात आता पुन्हा एका संतोष बांगर यांनी परत एकदा पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
त्यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असतांना आरपीआयच्या खरात पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी थेट मोक्काच्या कारवाईची मागणी केली आहे.
त्यामुळे आता सचिन खरात यांच्या मागणीनुसार संतोष बांगर यांच्यावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.