Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोफत अन्नछत्रमुळे शिर्डीत गुन्हेगारी’, डबल मर्डरवर सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य

Shirdi Double Murder : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिर्डी आज दुहेरी हत्याकांडाने हादरली. सकाळी कामावर निघालेल्या शिर्डी साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी 'मोफत अन्नछत्रमुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढतेय' असं म्हटलय.

'मोफत अन्नछत्रमुळे शिर्डीत गुन्हेगारी', डबल मर्डरवर सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य
sujay vikhe patil
Follow us
| Updated on: Feb 03, 2025 | 12:43 PM

शिर्डी आज दुहेरी हत्याकांडाने हादरली. या विषयावर बोलताना भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढतेय’ असं म्हटलं. “अत्यंत दुर्देवी घटना पहाटे चार वाजता घडली. अशा प्रकारे चाकूने वार करण्यात आले. खरतर अशी घटना पहिली कधी घडलेली नाही. ही अचानक झालेली एक निर्घृण हत्या आहे. चार-पाचच्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते. हा निरोप येता-येता सहा-सात वाजले. दोन मृतदेह वेगवेगळ्या स्पॉटवर आढळले. आता प्रवरा मेडिकलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत, तो धोक्यातून बाहेर यावा ही अपेक्षा. अजून मी डॉक्टरशी बोललेलो नाही” असं सुजय विखे पाटील म्हणाले.

“मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आम्ही जे बोललो होतो, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो, ते महाराष्ट्रला कळेल. हे प्लान मर्डर वाटत नाहीत, नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर आहेत” असं सुजय विखे पाटील म्हणाले. ‘आज त्यावर राजकारण नको. जे घडलं ते दुर्दवी आहे’ असं त्यांनी सांगितलं.

‘यात जाती-पातीचा विषय नाही’

“व्हाईटनर जे नशा करतात ती ही मुलं असावित. वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला, त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडून पैसे काढण्याच हे कृत्य आहे. यात जाती-पातीचा विषय नाही. हे नशेखोरांचं कृत्य आहे, दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील” असं सुजय विखे पाटील म्हणाले. “साडेपाचला पोलिस कर्मचा-याला फोन केला, त्या कर्माचा-याने तो अपघात सांगितला. त्याला सस्पेंड केलं जाईल. त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही त्याला पोलीस स्टेशनमध्ये राहणायाच अधिकार नाही” असं सुजय विखे पाटील म्हणाले.

कोण-कोणावर हल्ला

शिर्डीत आज पहाटेच्या सुमारास सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ हे साई संस्थानमध्ये निघाले होते. त्यावेळी आरोपीने वाटेत अडवून त्यांची निर्घृण हत्या केली. कृष्णा देहरकर हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला..

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.