Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या विंटर फेस्टिवलमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधलं नागरिकांचं लक्ष

कल्याणच्या विठ्ठलवाडीमध्ये विंटर फेस्टिव्हलमध्ये शिवजयंती निमित्त आरंभ महाराष्ट्राचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कल्याणच्या विंटर फेस्टिवलमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधलं नागरिकांचं लक्ष
winter festival 2023
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 5:34 PM

कल्याण : विठ्ठलवाडीत विंटर फेस्टिवलमध्ये ( Winter Festival 2023 ) शिवजयंतीच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने नागरिकांचं लक्ष वेधलं. या कार्यक्रमात शिवजयंतीनिमित्त शिवरायांचं प्रताप दाखवण्यात आला. प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला होता. हाच प्रसंग पुन्हा एकदा या कार्यक्रमात जिवंत करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एन्ट्री करताच वार्तावरण निर्मिती झाली. यावेळी 400 वर्षानंतर ही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली. यावेळी उपस्थितांनी उभे राहून महाराजांचं स्वागत केलं. हा प्रसंग डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला.

shiv jayanti

आरंभ महाराष्ट्राचा असं या कार्यक्रमाचं शिर्षक ठेवण्यात आलं होतं. या निमित्ताने वेगवेगळ्या कलाकारांनी आपली कला सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोरचं यंदा आधार आपुलकीचा फाऊंडेशनच्या वतीने भव्य दिव्य अशा Winter Festival चे आयोजन करण्यात आले आहे. ९ फेब्रवारी पासून सुरु असलेल्या या फेस्टिवलचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात लाईव्ह म्युझिक सोबत नागरिकांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा ही आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे खवय्ये आणि संगित प्रेमींसाठी हा विंटर फेस्टिव्हल पर्वनी ठरत आहे. तरुणाई सोबत अनेक जण आपल्या कुटुंबासोबत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

shiv jayanti 2023

आधार आपुलकीचा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज माळी यांनी सांगितलं की, कल्याण पूर्वचे आमदार मा. गणपतशेठ गायकवाड यांच्या सहकार्यातून अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच कल्याण शहरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्त सतत धावपळ करणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन तर होतच आहे. सोबत त्यांना आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ देखील घालवता येत आहे. नागरिकांकडून देखील या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे.

कल्याण पूर्वचे आमदार यांनी सांगितले की, ‘विंटर फेस्टिव्हल सारख्या कार्यक्रमामुळे नागरिकांना मनोरंजनासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या शहरातच त्यांचं मनोरंजन होत आहे. लोकांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे.’

महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या निमित्ताने या विंटर फेस्टिव्हलमध्ये २ दिवस खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद लूटला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागात साजरी केली जाते. शिवरायांचे विचार आणि शिवरायांचं कतृत्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून होत असतं. शिवजयंती निमित्त अनेक ठिकाणी बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात येतं.

सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज
वाल्मीक कराडने न्यायालयात दाखल केला आपण निर्दोष असल्याचा अर्ज.
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी
...तरच ST कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, MSRTCची इतक्या कोटींची मागणी.