मुंबईः संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली हे सगळ्यांना माहिती आहे. आपण लढून मिळवलेली मुंबई जनसंघानं (Janasangha) फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यांना मराठी हिंदुत्वावर (Hindutwa) प्रेम नाही. त्यांना सगळं स्वतःकरता हवंय, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भाजपवर केली. शिवसंपर्क अभियान टप्पा-२ च्या निमित्ताने ते बोलत होते. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांना आज उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागातील शिवसैनिकांना प्रोत्साहन दिले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी फोडली, याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले,’ संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली यांना मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळं स्वतः करता हवय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
राज्यभरातील शिवसैनिकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ काल प्रवक्त्यांची बैठक झाली आहे. मी अगदी थोडक्यात बोलणार. अनेक दिवसांनी शिवसंपर्क मोहिम राबवली जात आहे. इतर पक्ष मुहूर्ताची वाट न बघता संपर्क करताहेत. येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. विरोधकांमध्ये एक पध्दत आहे. पश्चिम बंगाल, केरळ सारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न सुरु आहे. बंगालचं मोठं कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो, महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची वेळी आली आहे.. हिंदूं मध्ये फोडाफोड सुरु आहे. महाराष्ट्रात मराठी अमराठी वाद निर्माण केले जात आहेत. ही भाजपची चाल आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
सध्या महाराष्ट्रात धार्मिकतेवरून राजकारण सुरु आहे, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, साहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे. त्यामुळे सध्या आपण कामावर लक्ष देऊ. गट प्रमुख, शाखाप्रमुख हे सगळे पदाधिकारी याद्या मला पाहिजे. जन्मापासून शिवसेनेकडे नविन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या मग बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, असं करत शिवसेना वाढवायची.
शिवसैनिकांना प्रोत्साहन देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ शिवसैनिक अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्याला समजू द्या. गावाची जनतेची कामे जरूर घेवून घ्या. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मी फिरणार शस्त्रक्रिया ही धोके पत्करून केली ते तुमच्या सोबत फिरण्यासाठी. आता मी दौरे करणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आता सुरु होईल, याकरिता शिवसैनिकांनी सज्ज होण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.