शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख मनसेत, राज ठाकरेंकडून थेट जिल्हाध्यक्षपदी वर्णी

शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (Prakash Kaudge Join MNS) यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख मनसेत, राज ठाकरेंकडून थेट जिल्हाध्यक्षपदी वर्णी
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 5:44 PM

नांदेड : शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (Prakash Kaudge Join MNS) यांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कौडगे यांचा अधिकृतपणे पक्षप्रवेश झाला. पक्ष प्रवेशासोबतच राज ठाकरे यांनी कौडगे यांच्यावर मनसे जिल्हाप्रमुखपदाची जवाबदारी सोपवली. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकत वाढण्यास मदत होणार आहे.

प्रकाश कौडगे कोण आहेत?

प्रकाश कौडगे नांदेड जिल्ह्यातील मोठं नाव आहे. नांदेडच्या सामाजिक आणि राजकीय पातळीवर त्यांचा चांगला दबदबा आहे. प्रकाश कौडगे शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणून नावाजलेले आहेत. मात्र, गेल्यावर्षी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेले प्रकाश कौडगे यांनी वेगळा मार्ग अवलंबत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या बंडखोरीचा बराच फटका शिवसेनेला बसला (Prakash Kaudge Join MNS).

गेल्या अनेक दिवसांपासून कौडगे मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला तेव्हा कौडगेदेखील प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यानंतर आता त्यांनी अधिकृतपणे मनसेत प्रवेश केला आहे.

प्रकाश कौडगे यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांनी त्यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. राज ठाकरे यांनी कौडगे यांच्या नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. कौडगे यांची आतापर्यंतची कामे पाहता राज ठाकरे यांना त्यांच्या या निर्णयाचा भविष्यात नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे. प्रकाश कौडगे यांच्या रुपाने मनसे नांदेडचा गड आणखी जास्त भक्कम आणि मजबूत करण्याच्या इराद्यात आहे.

मनसेकडून प्रकाश कौडगे यांना देण्यात आलेले पत्रक

हेही वाचा : गृहमंत्री म्हणाले, आयुष्यात असं वर्ष पाहिलं नाही, आरोग्य मंत्री म्हणतात, मानव जातीवर संकट!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.