कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादात भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Dibal) यांनी आज सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याबद्दल अनेक मोठमोठे दावे करत गंभीर आरोप केले.

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादात भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गंभीर आरोप, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:58 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Polittical Crisis) पार्श्वभूमीवर दिल्लीत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याबद्दल अनेक मोठमोठे दावे करत गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडल्या त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची माहिती होती, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना केला.

एकनाथ शिंदेंच्या बंडाला मूळ पक्षाचं समर्थ नाही हे सुद्धा राज्यपालांना माहीत होतं. राज्यपालांनी हे रोखणं गरजेचं होतं. पण त्यांनी ते केलं नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.

“राज्यपालांनी घटनेच्या तत्वांचं पालन केलं नाही. राज्यपालांनी एकनाथ शिंदेंचं काहीही ऐकायला नको होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत राज्यपालांना पूर्ण कल्पना होती. शिंदेंच्या बंडाला मूळ पक्षाचं समर्थ नाही हे सुद्धा माहीत होतं”, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना केला.

हे सुद्धा वाचा

“न्यायव्यवस्थेनं ठोस भूमिका घेतल्यास घटनेची तत्वं अबाधित राहतील. राज्यपालांनी हे रोखणं गरजेचं होतं. पण त्यांनी ते केलं नाही.राज्यपाल हे घटनात्मक पद असूनही त्यांनी राजकारण केलं. राज्यपालांनी घटनेच्या तत्वांचं पालन केलं नाही”, असा आरोप कपिल सिब्बल यांनी यावेळी म्हणाले. “राज्यपाल हे घटनात्मक पद असूनही त्यांनी राजकारण केलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मूळ पक्षाचं समर्थन नाही हे सुद्धा राज्यपालांना माहित होतं’, असंदेखील ते यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची प्रत्येक कृती ही पक्षविरोधी आहे. त्यांची प्रत्येक कृती ही त्यांचं सदस्यत्व काढून घेण्यासारखी आहे, असा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच “विधीमंडळातील सदस्यत्व ही वैयक्तिक मालमत्ता नाही. ती पक्षाची मालमत्ता आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.तसेच व्हीप हा राजकीय पक्षाचे कान आणि डोळे आहेत”, असं कपिल सिब्बल यावेळी म्हणाले.

यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बल यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. एखादा माणूस पक्षात आनंदी नसेल तर काय करायला हवं? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केला. त्यावर सिब्बल यांनी “तुम्ही तुमची भूमिका पक्षांतर्गत मांडू शकता”, असं उत्तर कपिल सिब्बल यांनी दिलं. “तुम्ही पक्षात असल्याचा दावा करताना पक्षाची घटना पाळणं गरजेचं आहे”, असंही सिब्बल यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.