Shinde vs Shivsena: शिवसेना अधिक आक्रमक, आणखी 5 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची करणार मागणी

एकनाथ शिंदे यांच्यासह 12आमदार शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. आता त्यात आणखी पाच आमदारांची नावे जोडली गेली आहेत

Shinde vs Shivsena: शिवसेना अधिक आक्रमक, आणखी 5 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची करणार मागणी
Shivsena rebel MLAImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 1:23 PM

मुंबई – ही लढाई हरणार नाही, आता रस्त्यावरही संघर्ष झाला तरी चालेल, पण आता हार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुढील दिशा स्पष्ट केलेली आहे. या आमदारांना परत येण्याची संधी दिली होती, मात्र त्यांनी ती घेतली नाही, आता त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेना (Shivsena)आणि महाविकास आघाडी (MVA government)ही लढाई सहजासहजी भाजपा आणि एकनाथ शिंदेंना जिंकू देणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवारही या संघर्षात उतरले आहेत. त्यांनीही हे बंडखोर आमदार कायदेशीरदृष्ट्या अडचणीत असल्याचे सांगितले आहे.

12आमदारांपाठोपाठ आणखी 5 आमदारांच्या निलंबनाची होणार मागणी

एकनाथ शिंदे यांच्यासह 12आमदार शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका गुरुवारी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. आता त्यात आणखी पाच आमदारांची नावे जोडली गेली आहेत. अजून पाच आमदार निलंबन करण्यासाठी शिवसेना अर्ज करणार आहेत.

या पाच आमदारांवरही कारवाईची मागणी

सदा सरवणकर प्रकाश आबिटकर संजय रयमुळकर बालाजी कल्याणकर रमेश बोरनारे

हे सुद्धा वाचा

काल कोणत्या 12 आमदारांची नावे

1) एकनाथ शिंदे 2) अब्दुल सत्तार 3) संदीपान भुमरे 4) प्रकाश सुर्वे 5) तानाजी सावंत 6) महेश शिंदे 7) अनिल बाबर 8) यामिनी जाधव 9) संजय शिरसाट 10) भरत गोगावले 11) बालाजी किणीकर 12) लता सोनावणे

तुमच्या धमक्यांना घाबरत नाही- एकनाथ शिंदे

बहुमत हे आपल्याकडे आहे, असा दावा एकनाथ शिंदे य़ांनी केला आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेतेपद आणि त्यांनी नेमलेल्या प्रतोदाला कायदेशीरदृष्ट्या अर्थ नसल्याचे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. आमदारांच्या निलंबनाची कारवाईची मागणी करण्यात आली असली तरी ही तक्रार बेकायदेशीर असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला यावरुन इशारा दिलेला आहे. हा सत्तासंघर्ष येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.