संतोष बांगर आणि अधिकारी यांची एकमेकांना अतिशय अर्वाच्य शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना आमदार संतोष बांगर यांची एका अधिकाऱ्यासोबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लिप प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी मुख्यमंत्र्यांना कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला आहे.

संतोष बांगर आणि अधिकारी यांची एकमेकांना अतिशय अर्वाच्य शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
santosh bangarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 5:23 PM

मुंबई : शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष बांगर आणि अधिकारी एकमेकांवर अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ट्विट करत अयोध्या पोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काही कारवाई करणार की नाहीत? असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही.

“शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे. आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार?”, असा सवाल अयोध्या पोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

संतोष बांगर आणि वाद

संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. मध्यंतरी त्यांनी एकाला कानशिलात लगावल्याची बातमी समोर आलेली. त्यांचं अनेकदा या न त्या कारणास्तव सरकारी अधिकाऱ्यांसोबतही वाद होत असतो. त्यांचे फोनवरील संभाषणात अधिकाऱ्यांसोबत भांडणाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचं याआधी देखील बघायला मिळालं आहे. संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी तर एका गावात जत्रेला गेल्यानंतर वाद उफाळला तेव्हा आपल्याच समर्थकाच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे वाद आणि संतोष बांगर यांचं एक समीकरणच आहे, अशी चर्चा असते.

विशेष म्हणजे शिवसेनेतून बंड केल्यानंतर गद्दार कोण म्हणेल त्याच्या कानशिलात लावा, असा आदेशच संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर त्यांची हॉस्पीटलच्या बिलावरुन एका डॉक्टरला फोनवरुन दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती. याचा विसर पडत नाही तोच त्यांनी कामगारांसाठी असलेल्या (Midday meal) मध्यान्ह भोजनाचा निकृष्ट दर्जावरुन उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. एका उपहारगहाची पाहणी करीत असताना अन्नाचा (Poor quality) निकृष्ट दर्जा पाहून बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली.

दरम्यान, आता नुकत्याच शिवीगाळच्या व्हायरल होत असणाऱ्या ऑडिओ क्लिपवर ते काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित प्रकरण नेमकं काय होतं ते समजू शकलेलं नाही. त्यामुळे बांगर काय खुलासा करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.