मनोज जरंगे वैफल्यग्रस्त, त्यांच्या डोक्यात फरक पडला… फडणवीस सरकारमधील मंत्र्याचा थेट हल्ला
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका, अशा शब्दात जहरी टीका त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख प्रकरणावरुन आक्रमक झाले आहे. त्यांनी संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी मनोज जरांगेवर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडला आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका, अशा शब्दात जहरी टीका त्यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. कायदा आपले काम करणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे, असे जयस्वाल यांनी म्हटले.
गुणरत्न सदावर्ते यांची जरांगे यांच्यावर टीका
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संतोष देशमुख प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मृत्यू व्यक्तीवर राजकारण केली जात आहे. मोर्चा निघाला त्याला दुःखाच्या संदर्भ आहे. परंतु तुम्ही तिथे जावून अर्वाच्च भाषेत बोलत आहात. मनोज जरांगे रस्त्यावर फिरु न देण्याची भाषा करत आहे. राज्यातील रस्ते त्यांचे नाहीत. ते धनंजय मुंडे यांच्यावर गलिच्छ भाषेत वक्तव्य करत आहेत. धनंजय मुंडे भटक्या विमुक्त समाजातून येतात. त्यामुळे त्यांच्यावर या पद्धतीने बोलले जात असल्याचे सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते पुढे म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असा प्रकार बोलणे असंस्कृतपणा आहे. उच्च जातीच्या मंत्र्यावर असा बोलले गेला असते तर लगेच कारवाई झाली असती. मराठा आमदारांचा दबाव आणला गेला असता. आता परभणीचा पोलिसांकडून मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यावर कारवाई होण अपेक्षित आहे. त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. धस तुम्ही कितीही गलिच्छ भाषेत बोलले तरी आमच्या धनंजय मुंडे यांच्या बरोबरी करू शकत नाही.