आता पोलीस लाचर झाले, पोलीस नावालाच राहिले…भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
विक्रांतने चांगले विवेचन केले. माझे डोळे भरून आले. खरं तर मला हुंदके आले. पण मी स्वत:ला आवरले. विक्रांत तू आक्रमक भाषण केले. परंतु तुझ्या भाषेचा दर्जा खालवला नाही. त्यामुळे मला भरुन आले.
चिपळून, रत्नागिरी, | दि. 10 मार्च 2024 : लक्षात ठेवा, उशीजवळ साप ठेऊन झोप कधी येत नाही. पोलीस ठाण्यात काय झाले. पोलीस ठाण्यात याद्या घेऊन कोण जात होते. हा आमच्या नाही, याला अटक करा. हा आमचा आहे, त्याला सोडा, असे कोण सांगत होते. आमच्या कार्यकर्त्याचा सख्या बहिणेचे लग्न होते. परंतु त्याला जामीन मिळाले नाही. लग्नात मी गेलो होतो. तेव्हा त्याचे वडील म्हणाले, काय झाले गोट्या आला नाही तर…परंतु गोट्याच्या रुपात हा भास्कर आला आहे. पोलीस लाचर झाले, ते पोलीस राहिले नाही. केवळ नावालाच पोलीस आहे. पोलिसांनी त्या पदाला काळीमा लावली आहे, असा पोलिसांवर घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला.
विक्रांत यांच्या भाषणामुळे का आश्रू
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. त्यावेळी त्यांनी जोरदार हल्ला केला. विक्रांत जाधव यांच्या भाषणावर बोलताना भास्कर जाधव यांनी म्हटले की, विक्रांतने चांगले विवेचन केले. माझे डोळे भरून आले. खरं तर मला हुंदके आले. पण मी स्वत:ला आवरले. विक्रांत तू आक्रमक भाषण केले. परंतु तुझ्या भाषेचा दर्जा खालवला नाही. त्यामुळे मला भरुन आले. मी स्वत:ही कधी व्यक्तीगत पातळीवर जाऊन भाषण केले. माझ्या भाषेत नेहमीच सभ्यता राहिली. विक्रांत तू ही ती प्रथा कायम ठेवली. त्याबाबत मी जाहीरपणे कौतूक करतो.
काय म्हणाले होते विक्रांत जाधव
विक्रांत जाधव यावेळी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्ला भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. त्यांच्या एखादा खालचा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे.