‘तिकीट मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे राक्षस असं म्हणणं योग्य नाही’, रामदास कदम यांचा श्रीनिवास वनगा यांना टोला

"एकदमच पक्षप्रमुखाच्या बाबतीत टोकाचे भूमिका घेणे हे योग्य नाही. आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे देव झाले आणि हे राक्षस झाले असं म्हणणं योग्य नाही", असं रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी वनगा यांना महत्त्वाचं आवाहन देखील केलं.

'तिकीट मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे राक्षस असं म्हणणं योग्य नाही', रामदास कदम यांचा श्रीनिवास वनगा यांना टोला
श्रीनिवास वनगा आणि रामदास कदम
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 9:56 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा हे माध्यमांसमोर ढसाढसा रडले. यानंतर ते कालपासून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. वनगा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या टीकेवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकदमच पक्षप्रमुखाच्या बाबतीत टोकाचे भूमिका घेणे हे योग्य नाही. आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे देव झाले आणि हे राक्षस झाले असं म्हणणं योग्य नाही”, असं रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी वनगा यांना महत्त्वाचं आवाहन देखील केलं.

“आमदाराला तिकीट कापण्याचं दुःख होऊ शकतं. हे मी समजू शकतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं का केलं? हे समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि सांगितलं होतं की, तुम्हाला विधानपरिषद देतोय. कधी कधी एखादी सीट पडणारी असेल तर जागा बदलाव्या लागतात. माझा आवाज चॅनलच्या माध्यमातून श्रीनिवास वनगा यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर मी वनगा यांना सांगू इच्छितो. निश्चितपणे एकनाथ शिंदे तुम्हाला न्याय देतील”, असं रामदास कदम म्हणाले.

निवडणूक आयोगाकडून माझ्या गाडीला परवाना

“महाराष्ट्रात माझी स्टार प्रचारक म्हणून पक्षाकडून नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाकडून माझ्या गाडीला परवाना मिळालेला आहे. बुलढाणा, मालेगाव या ठिकाणी सभा घेतल्या. त्यासाठी मी हेलिकॉप्टरने गेलो नही. आणखी 30 ते 40 सभा महाराष्ट्रात घेईन. जिथे जिथे एकनाथ शिंदे सांगतील तिथे तिथे मी सभा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षाकडून जे जे काम सांगितलं जाईल तिथे स्टार प्रचारक म्हणून त्याला न्याय दिला जाईल”, असं रामदास कदम म्हणाले.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम यांची ठाकरेंवर टीका

“उद्धव ठाकरेंनी दावा केला होता की, 40 आमदारांना पाडणार. बुलढाणा, मालेगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना उमेदवारच मिळत नाहीयत. उमेदवार आयात करावे लागतात. 40 आमदारांना खोके खोके म्हणून बदनाम करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी जे पाप केलंय त्याचं प्रायश्चित्त त्यांना या निवडणुकीत भोगावं लागेल”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील’

“आमचे 70 आमदार या निवडणुकीत किमान निवडून येतील. 101 टक्के निवडून येतील. याबाबत मनात शंका नाही. महायुतीचे किमान दोनशे ते पावणे दोनशे आमदार निवडून येतील. पुन्हा भगवा फडकेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील”, असा दावा रामदास कदम यांनी केला. तसेच “दापोली मतदारसंघांमध्ये योगेश कदम सक्षम आहेत. त्यांनी विविध प्रकारचे विकासकामे केलेली आहेत. त्या ठिकाणी मी थांबण्याची गरज नाही. महाराष्ट्रात फिरणार बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न कसं पूर्ण होईल”, त्याचा ध्यास घेऊन महाराष्ट्रात जाणार, असं रामदास कदम म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....