‘आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून शप्पथ घेऊन सांगा…’, रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीच परिणाम होणार नाही, असादेखील दावा रामदास कदम यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं.

'आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून शप्पथ घेऊन सांगा...', रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 9:31 PM

शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केलं. विशेष म्हणजे रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं. “25 वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता उपभोगली तेव्हा तुम्ही हेच केलं का? विधीमंडळात शिवाजी पार्कवर भाषण केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाषणे केली. दाढीवाला बाबा आणि जॅकेट वाला बाबा ही भाषा माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही. आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून शप्पथ घेऊन सांगा की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा चालवता”, असं चॅलेंज रामदास कदम यांनी दिलं.

“उद्धव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरेंनी ज्या भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले, त्या उद्धव ठाकरेंना कोकणात बसायला जागा मिळणार नाही”, असा दावा रामदास कदम यांनी केला. त्यांच्या या टीकेवर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रामदास कदम यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

रामदास कदम यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. “शरद पवार यांच्या इतपत बोलण्याएवढा मी मोठा माणूस नाही. माझंही वय आता 73 वर्ष झालंय. या वयातही ते काम करतात. त्यांना सॅल्यूट द्यावे लागेल, असा टोला रामदास कदम यांनी शरद पवारांना लगावला. एका निवडणुकीत पावसात भिजले आणि भिजून भाषण केलं. त्यानंतर त्यांनी अख्खा महाराष्ट्र जिंकला. राज्यसभेची मुदत माझी दीड वर्षाची आहे ही शरद पवारांनी टाकलेली गुगली आहे. शरद पवार यांनी लोकांना भावनिक गुंडाळलं आहे. ते प्रश्नचिन्ह निर्माण करून लोकांना भावनेमध्ये गुंतवत आहेत. शरद पवार आता जनता खुळी राहिलेली नाही. ये पब्लिक हैं सब जानती हैं”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

हे सुद्धा वाचा

“शरद पवार यांच्यावर बोलाण्याइतका मी मोठा नाही. पण लोकांना भावनेत कसं गुंडाळायाच हे शरद पवार यांच्याकडून शिकावं. यापुढे निवडणुका लढवणार नाही हे शरद पवार यांचं वक्तव्य लोकांना भावनिक करणारं आहे. पण आता लोकं भावनिक होणार नाहीत”, असं रामदास कदम म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.