नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी: राऊत
मुंबईत एका नटवीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
मुंबई: मुंबईत एका नटवीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. राऊत यांनी हाथरस येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवतानाच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. (sanjay raut slams bjp)
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हाथरसच्या घटनेवरून भाजपला जोरदार फटकारे लगावले आहेत. एका नटवीच्या बेकायदा बांधकामासाठी काही लोकांनी आकांडतांडव केलं होतं. आता त्यांनी हाथरसला जाऊन दलित, शोषित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढवली पाहिजे. जेव्हा दलित, शोषित समाजातील मुलगी आक्रोश करते तेव्हा तिचा आवाज जगापर्यंत पोहोचू नये म्हणून दडपशाही केली जाते, असं सांगतानाच पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं मी पाहिलं. हा प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. महाराष्ट्रातही अनेक आंदोलने झाली. पण असा प्रकार कधी घडला नाही आणि घडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागमी कोणी करत असेल तर हा त्या राज्याचा प्रश्न आहे, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. (sanjay raut slams bjp)
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बलरामपुर (Balrampur) जिल्ह्यातील गैसडी येथील एका गावात 22 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. आरोपींनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिची कंबर आणि पाय तोडले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच पीडितेचा मृत्यू झाला होता. पीडित मुलगी 29 सप्टेंबरच्या सकाळी कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. या वेळी कारमधून आलेल्या 3-4 जणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. नराधमांनी अत्याचार करून तिच्या कंबरेची आणि पायाची हाडेदेखील मोडली. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी पीडिता जखमी अवस्थेत घरी पोहोचली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा आधीच तिचा मृत्यू झाला होता.
VIDEO | राहुल गांधींसह प्रियंका गांधी हाथरसकडे गाडीतून उतरून पायी रवाना – TV9https://t.co/9C0NmQm90L#Hatharas #HathrasHorror #HathrasCase #RahulGandhi #PriyankaGandhi
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
संबंधित बातम्या:
यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी
(sanjay raut slams bjp)