‘त्यांना ओवा द्या ओवा, पोटात दुखतंय’ ; शहाजी बापूंचा विरोधकांवर पलटवार
शहाजी बापू यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते सांगल्यात बोलत होते.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगोल्यात बोलत होते. शहाजी बापू यांच्यावर बंगल्यावरून टीका करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या पोटात दुखत असेल तर त्यांना ओवा खायला द्या असा टोला शहाजी बापू यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू?
बंगल्यावरून टीका करणाऱ्यांवर आमदार शहाजी बापू यांनी निशाणा साधला आहे. माझं जुनं घर ज्या घरामध्ये पत्रे गळत होते, झोपता येत नव्हतं माझी बायको कसा स्वयंपाक करत होती याचा कोणी विचार केला नाही. मात्र मी एक बंगला बांधला तर त्याच्यावरती टीका करत आहेत. तालुक्यातील पहिला बंगला कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख यांनी आमदार असताना बांधला होता, त्यांनी त्यांच्या मुलासाठी पंढरपूर मध्ये बंगला बांधला आहे. पेनुरमध्ये बंगला बांधला, त्याचबरोबर अमिताभ बच्चनच्या शेजारी देखील मुंबईमध्ये त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे. त्यामुळे मी बंगाला बांधला म्हणून ज्यांच्या पोटात दुखतं त्यांना ओवा खायला द्या असा सल्ला शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, दीपक आबांमुळं मी निवडून आलो असे सगळीकडे सांगत सुटलेत, मात्र त्यांची मला मदत झाली हे खरे पण मी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये निवडून येतोय आणि 95 साली दीपक आबा आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीमध्ये बसत होते, त्यांची गाडी देखील मी पलटी केली आणि मुंबईला पोहोचलो. मी दीपक आबांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो, त्यांना काहीतरी कराव लागतंय असं म्हणून रात्री दोन वाजेपर्यंत थांबलो होतो. फोन करतोय दीपक आबांना मात्र ते दौरा आहेत म्हणून सांगताहेत, विधानसभेचे आमदार असताना कुठे गेले होते दौरे असं म्हणत त्यांनी दीपक साळुंखे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.