राज ठाकरे यांचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांचा भर सभेत थेट पोलिसांवर निशाणा, नेमकं प्रकरण काय?

सुषमा अंधारे यांनी आज पोलिसांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचादेखील उल्लेख केला.

राज ठाकरे यांचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांचा भर सभेत थेट पोलिसांवर निशाणा, नेमकं प्रकरण काय?
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 9:31 PM

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज सिंधुदुर्गातील कणकवली येथे दाखल झाली. यावेळी संबंधित परिसरात काहीसं तणावाचं वातावरण होतं. पण तरीही सुषमा अंधारे यांची सभा झाली. सुषमा अंधारे गेल्या काही दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरत आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन निशाणा साधत आहेत. त्यांनी आज देखील भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. पण आज त्यांनी पोलिसांवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचादेखील उल्लेख केला.

“पोलीस म्हटले तुम्ही पंतप्रधानांची नक्कल करता. तुमच्यावर केस टाकली. आता पोलीस डिपार्टमेंटचा कॅमेरा चालूय. पण या डिपार्टमेंटच्या कॅमेऱ्याला एक गोष्ट दिसत नाही का, आम्ही नुसते प्रश्न विचारले. मी तर एकदम म्हणजे त्यांच्यासमोर काहीच नाही, असे आमचे चुलत भाऊ असणारे राज भाऊ यांचा नकालांमध्ये कुणी त्यांचा हात धरतील का? त्यांच्यावर केस टाकण्याची पोलिसांनी हिंमत केली का? तर नाही केली”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

“पोलिसांचा नेमका प्रोब्लेम आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा अर्थच यांना अजून कळलेला आहे की नाही तेच कळत नाही. सज्जनांचं रक्षण करु आणि दुर्जनांचा नाश करु. हे जे गृह खात्याचं बीद्र आहे त्यापेक्षा पुढाऱ्यांचं रक्षण करुन आणि सर्वसामान्यांचा नाश करु, असं काही ब्रीद घेऊन गृहखातं काम करतंय असं वाटतंय”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“गृह खात्याला स्वत: सद्सदविवेक अजिबात पणाला लावासा वाटत नाही. गृह खात्याच्या लक्षातच येत नाही की आपण सेक्शन कसे लावतो”, असं सुषमा अंधारे म्हणाले.

“गृह खात्याला काही कळत नाही. गृह खातं नक्की सर्वसामान्यांसाठी काम करतं का? केंद्रातल्या आणि राज्यातल्या गृह खात्याने विरोधकांना संपवण्याचे ठरवले आहे. तुम्ही प्रश्न विचारलात तर तू हिंदू नाहीस का? तुमच्या विरोधात प्रश्न विचारला तर तुम्हाला हिंदू आठवतो”, अशी टीका त्यांनी केली.

“भारतीय जनता पार्टीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खूप मोठा आदर आहे, असं दाखवतात. सावरकरांनी चारवेळा इंग्रजांची माफी मागितली”, असं ट्विट राणेंच्या बारक्या मुलाने केले”, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.