आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक व्हिडिओ, काठी घेऊन मिरवणुकीत युवकांना मारहाण

ShivSena | आमदार संजय गायकवाड काठीने युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

आमदार संजय गायकवाड यांचा धक्कादायक व्हिडिओ, काठी घेऊन मिरवणुकीत युवकांना मारहाण
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:26 AM

गणेश सोलंकी, बुलढाणा | दि. 1 मार्च 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी दिलेली मुलाखत त्यांच्यासाठी अडचणीची ठरली. त्या मुलाखतीत त्यांनी १९८७ मध्ये आपण वाघाची शिकार केली असल्याचा दावा केला. पुढे जाऊन ते म्हणाले, त्या वाघाचा दात गळ्यात बांधला आहे. त्यांची ही मुलाखत व्हायरल होताच वनविभाग सक्रीय झाले. वन विभागाने वाघाचा दात जप्त करत प्रयोगशाळेत तपासणीला पाठवला आणि संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायलर झाला आहे. त्यात त्यांनी मिरवणुकीत युवकांना काठीने मारहाण केली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहे. त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारहाण

आमदार संजय गायकवाड काठीने युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आमदार गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलढाणा शहरातील धक्कादायक घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही.

हे सुद्धा वाचा

शेत जमीन प्रकरणात गुन्हा

आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव मृत्यूंजय गायकवाड अडचणीत आले आहे. शेत जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांच्यासह काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. अखेर 28 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नागपूर येथील रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय न्यायालयात गेल्या होत्या. त्यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असे त्यांनी न्यायालयात म्हटले.

हे ही वाचा

Video | वाघाची शिकार केली, दात गळ्यात घातला, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.