आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली, मतदारांना शिव्यांची लाखोली…अनेक अवमानजनक शब्दांचा वापर

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्या टीकेतून भाजप नेतेही सुटले नाही. ते म्हणाले, भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ५ कोटी रुपये घेतले आणि दीड कोटी रुपयांची गाडी घेतली. अनेकांनी गाड्या घेतल्या. निवडणुकीत विरोधी उमेदवाराने ७० कोटी वाटले.

आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली, मतदारांना शिव्यांची लाखोली...अनेक अवमानजनक शब्दांचा वापर
sanjay gaikwad mla
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 9:41 AM

Sanjay Gaikwad: वाद आणि आमदार संजय गायकवाड यांचा जवळचा संबंध आहे. काही महिन्यांपूर्वी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना संजय गायकवाड यांनी शिविगाळ केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासंदर्भात वाद निर्माण करणारे वक्तव्य केले होते. आता आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. बुलढाण्यातील जयपूरमध्ये जाऊन मतदारांसंदर्भात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले आहे. मतदारांपेक्षा XX बऱ्या, मतदारांना फक्त दारू, मटण पाहिजे, मतदार विकले गेले आहेत, अशा आरोप संजय गायकवाड यांनी केला.

मतदारांना शिविगाळ

आमदार संजय गायकवाड यांचा जयपूर येथे दोन दिवसांपूर्वी एका सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला मतदान कमी मिळाले यामुळे खंत व्यक्त केली. जाहीर भाषणात आमदार गायकवाड हे मतदारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, तुम्हाला फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे. मतदार दोन दोन हजारात विकले गेले. XXXX XX असे म्हणत यांच्यापेक्षा XX बऱ्या. याप्रकारे मतदारांना संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड म्हणतात, तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त दारू, मटण पाहिजे. मी कोट्यवधीची कामे केली. तरीही लोकांनी मला मतदान केले नाही. मी अब्जावधी रुपयांना लाथ मारली. शेवटी सत्याचा विजय झाला. माझ्या विरोधात सगळे विरोधक एक झाले. परंतु सगळे लटकले.

हे सुद्धा वाचा

भाजप नेत्यांवर टीका

संजय गायकवाड यांच्या टीकेतून भाजप नेतेही सुटले नाही. ते म्हणाले, भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ५ कोटी रुपये घेतले आणि दीड कोटी रुपयांची गाडी घेतली. अनेकांनी गाड्या घेतल्या. निवडणुकीत विरोधी उमेदवाराने ७० कोटी वाटले. मुस्लिम समाजाला सुद्धा आमदार गायकवाड यांनी सवाल केला? त्यांना म्हटले, तुमचे फतवे कुठून येतात. जो कुणी फतवा काढतो त्याला अगोदर बिचारा की फतवा काढण्यापूर्वी त्या पार्टीसोबत कमिटमेंट करा की किती लोकांना नोकरी देणार आहे. 288 आमदारपैकी तुमचे 6 आमदारसुद्धा जात नाहीत. त्यांच्याकडून 25 आमदार मागा. आहे का हिमंत? असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.