मोठी बातमी | उद्धव ठाकरेंचं पद अवैध ठरवणारा ‘तो’ मुद्दाच निकाली काढणार? शिवसेनेची पुढची रणनीती काय?

घटनापीठ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असेपर्यंत तसंच अंतिम निर्णय येईपर्यंत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम राहू शकतात, असा दावाही ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

मोठी बातमी | उद्धव ठाकरेंचं पद अवैध ठरवणारा 'तो' मुद्दाच निकाली काढणार? शिवसेनेची पुढची रणनीती काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 12:02 PM

दिनेश दुखंडे, मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं पद अवैध असल्याचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे गटावर कालच्या सुनावणीत मोठं प्रश्नचिन्ह उभं ठाकलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शिवसेना पक्ष (Shivsena Party) प्रमुख पदच अवैध असल्याचा युक्तिवाद काल केंद्रीय निवडणूक आयोगासमोर करण्यात आला. या मुद्द्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या लढाईत शिंदे गटासमोर ठाकरे गट बॅकफूटवर जातो की काय अशी चिन्ह आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या पदावरच प्रश्नचिन्ह उभं करणारा मुद्दा निकाली काढण्याची शिवसेनेची रणनीती सुरु आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडूनच मोठी माहिती समोर आली आहे.

येत्या 23 जानेवारीला शिवसेना पक्षांतर्गत प्रतिनिधी सभा आयोजित करण्याची परवानगी द्या, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी पक्षांर्गत निवडणूक घेणे राजकीय पक्षांना बंधनकारक आहे. यापूर्वी 23 जानेवारी 2018 ला शिवसेनेची प्रतिनिधी सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदी पुन्हा नेमण्याचा तसंच ज्येष्ठ नेते आणि नव्या नेत्यांच्या नियुक्तीचे निर्णय घोषित करण्यात आले होते….

वरळी डोम येथे ही प्रतिनिधी सभा पार पडली होती.. सध्या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण तसंच अधिकृत मान्यता गट, शिंदे गटाच्या आमदारांचे निलंबन ही प्रकरणे केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणीसाठी आहेत..

प्रतिनिधी सभा आयोजित करण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी जरी दिली नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला तूर्त कुठलाही धोका नाही, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

घटनापीठ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असेपर्यंत तसंच अंतिम निर्णय येईपर्यंत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम राहू शकतात, असा दावाही ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

आयोगासमोर शिंदे गटाचा युक्तिवाद काय?

शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यावरील युक्तिवादात काल शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी मोठा युक्तिवाद केला. शिवसेनेची घटना ही बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केली होती.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना असताना शिवसेना कार्यध्यक्ष हे पद उद्धव ठाकरे यांना तेव्हा देण्यात आलं होतं. मात्र बाळासेहब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख पद अवैध रित्या तयार करण्यात आलं. तसंच २०१८ मध्ये कुणालाही कल्पना न देता यात बदल करण्यात आले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पक्ष प्रमुख पदच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला.

शिवसेनेतलं सख्यात्मक पाठबळ आमच्याकडे असल्याचा दावा काल शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.