कोल्हापुरात वातावरण तापलं, राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर शेकडो कार्यकर्ते, काय घडतंय?

कोल्हापुरात राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते जमले आहेत. क्षीरसागर यांच्या इमारतीत राहणाऱ्या वरपे कुटुंबियांची आज अंबादास दानवे यांनी भेट घेतली. याच गोष्टीली कार्यकर्त्यांनी विरोध केला.

कोल्हापुरात वातावरण तापलं, राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर शेकडो कार्यकर्ते, काय घडतंय?
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 6:13 PM

भूषण पाटील | 8 फेब्रुवारी 2024 : कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या इमारतीत राहणाऱ्या वरपे कुटुंबियांची भेट घेतली. पण त्यांच्या या कृतीला राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध झाला. अंबादास दानवे यांचा विरोध करण्यासाठी कार्यकर्ते थेट इमारतीत घुसण्याच्या प्रयत्नात होते. ते अंबादास दानवे यांना जाब विचारण्याच्या तयारीत होते. पण पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यामुळे मोठा वाद निवळला. तरीसुद्धा शेकडो कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती.

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याच शिरगंगा संकुलात राहणारे राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी वरपे कुटुंबाकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली होती. संबंधित मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला होता. पण तरीदेखील या प्रकरणी पोलिसांकडून तक्रार दाखल केली जात नाही, असा आरोप वरपे कुटुंबियांनी केला होता.

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार घेतला. यावेळी राजेंद्र वरपे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार आणि पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार अंबादास दानवे यांच्याकडे केली. यानंतर अंबादास दानवे यांनी कोल्हापूरच्या पोलीस अधिक्षकांना फोन करुन जाब विचारला. पोलीस आणि राजेश क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही, असं दानवे म्हणाले. यानंतर दानवे राजेंद्र वरपे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अंबादास दानवे वरपे कुटुंबियांच्या भेटीसाठी क्षीरसागर राहत असणाऱ्या इमारतीत गेले.

अंबादास दानवे यांचा विरोध करण्यासाठी क्षीरसागर यांचे समर्थक त्यांच्याा घराबाहेर जमले होते. तर दुसरीकडे दानवे वरपे कुटुंबियांच्या भेटीसाठी जाण्याबाबत ठाम होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता क्षीरसागर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य राखीव दलाची मोठी टीम इथे दाखल झाली. क्षीरसागर यांच्या समर्थकांनी दानवे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्रचंड विरोध केला. पण तो विरोध झुगारुन पोलिसांनी अंबादास दानवे यांना वरपे कुटुंबियांची भेट घेऊ दिली.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.