संजय राऊत यांच्या शहाजी बापू यांची तुफान फटकेबाजी…थेट दिले आव्हान….
shahaji bapu patil, Sanjay Raut: संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी शहाजी पाटील यांनी मत दिले. पण ते इतकी वर्षे खासदार आहेत, त्यांनी आतापर्यंत एखादे काम खासदार निधीतून केल्याचे कुठे दिसत नाही. त्यांनी त्यांच्या कामबद्दल कधी काही सांगितले का?
माझी नजर गरुडासारखी आहे. मी दवाखान्यात असताना कोण कुठे? काय,काय बोलत होते, ते सगळे मला माहीत आहे. मला डॉक्टर दहा वेळा म्हणाले शस्त्रक्रिया करु या. परंतु मी केली नाही. कोणाच्या शरीरावर कोणी बोलू नये. माझ्या मारणाची वाट विरोधक बघत होते. त्यांना मी सांगतो, माझी अजून माझी ३५ वर्षे शिल्लक आहेत. मी सर्वांना खांद्यावर घेऊन जाणार आहे. जगणे किती आणि मारणे किती हे महत्वाचे नाही. परंतु दुसऱ्यासाठी झटने हा मानव धर्म आहे. हा जन्म भगवंतांनी दिला आहे. एका वेळेस सोळा जाणवरांची धार काढणाऱ्या आईचे दूध पिणाऱ्या मातेचा मी औलाद आहे, असा इशारा काय झाडी काय डोंगर फेम म्हणून प्रसिद्ध झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांना दिला.
संजय राऊत यांच्यावर तुफानी हल्ला
लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक कशा रितीने रोज वेगवेगळ्या शब्दात टीका करीत होते. त्याचा शहाजी बापू यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, खऱ्या बापाचे असल्यासारखे एका शब्दावर ठाम राहा. संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी करताना शहाजी बापू म्हणाले, रोज सकाळी दांडकी गोळा करून तो बडबडत आहे. ते रोज महाराष्ट्राला भांबावून सोडण्याचे काम करत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
आता ते माझ्यावर बोलतच नाही…
संजय राऊत यांना खासदार होण्यासाठी शहाजी पाटील यांनी मत दिले. पण ते इतकी वर्षे खासदार आहेत, त्यांनी आतापर्यंत एखादे काम खासदार निधीतून केल्याचे कुठे दिसत नाही. त्यांनी त्यांच्या कामबद्दल कधी काही सांगितले का? ते आता आपल्याबद्दल बोलत नाही. कारण एकदाच त्यांना असे उत्तर दिले आहे, की त्याची बडबड कायमची बंद केली.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर येणार आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या नकारात्मक भाषणावर शहाजी बापू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मतदार संघासाठी भरीव निधी मिळणार आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी यावेळी सांगितले.