‘…तर मविआमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, त्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा थेट इशारा

काल अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, ठाकरे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

'...तर मविआमध्ये अस्वस्थता होऊ शकते', त्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा थेट इशारा
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 3:09 PM

गुरुवारी शरद पवार यांचा वाढदिवस होता, वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच या भेटीवर बोलताना सुनंदा पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवारसाहेब यांचा काल वाढदिवस होता, कौटुंबीक आहे. सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यात गैर नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेच मलाही वाटतं. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्रित यावं असं मला वाटतं. अजितदादा जेव्हा भेटतील तेव्हा मी त्यांना शुभेच्छा नक्की देईल असं सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे. सुनंदा पवार यांच्या या वक्तव्यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

काल शरद पवार यांचा वाढदिवस होता, त्यामुळे सर्वजण कुटुंब म्हणून एकत्र येणं स्वाभाविक आहे. सुनंदा पवार नेमक्या कोणत्या संदर्भानं म्हटल्या? कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं की राजकारणात एकत्र यायला हवं? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  राजकारण म्हणून एकत्रित यायला हव असेल तर अजितदादांच्या संगतीत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक आहेत ते मारकडवाडी जाऊन पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरतात त्याबद्दल अजित पवार यांची काय भूमिका आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी महिला आयोगावर असणाऱ्या बाई टीका करत असताना अत्यंत बिकट हास्य करत होत्या, हे सगळं चीड आणणारं आहे. या लोकांबद्दल  भूमिका काय आहे? त्या जर राजकारणात एकत्र आलं पाहिजे असं म्हणत असतील तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो, त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता होणं फार स्वाभाविक आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे. भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.