तब्बल 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरेंना अनोखी भेट

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून अनोखी भेटवस्तू देण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं तब्बल 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना भेट म्हणून देण्यात आलं आहे.

तब्बल 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरेंना अनोखी भेट
तब्बल 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 3:59 PM

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 27 हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे.

शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रूत आहेत. शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. २७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते.

उद्धव ठाकरे यांना पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, हिंगोली – नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात, उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, कलाकार शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान उपस्थित होते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.