संजय राऊत यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दांत घोषणाबाजी, सांगतील नेमकं काय घडलं?

संजय राऊत (Sanjay Raut) आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांची मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांत घोषणाबाजी केली.

संजय राऊत यांच्यासमोर मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह शब्दांत घोषणाबाजी, सांगतील नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:41 PM

सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यांच्या दौऱ्यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दांत घोषणाबाजी केली. त्यावेळी राऊत यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांविषयी बोलणं योग्य नाही असं मी व्यासपीठावरुन सांगतोय, असं म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली. “सन्माननीय मुख्यमंत्र्याविषयी बोलणं योग्य नाही असे मी या व्यासपीठावरून सांगतो. पण शेवटी या महाराष्ट्राच्या भावना असतील तर माझा नाईलाज आहे”, अशी मिश्किल टिप्पणी राऊतांनी यावेळी केली.

“महाराष्ट्रात जिथे-जिथे जातात, या खोक्याच्या घोषणा त्यांना ऐकायला मिळतात. कारण हे तुम्ही ओढवून घेतलं आहे. तसा शिक्का सुद्धा बसला आहे. हा शिक्का पुसता येणार नाही. ‘दिवार’ पिक्चरमध्ये जसं अमिताभ बच्चन चोर आहे, तसेच त्यांचे चाळीस चोर आहेत, गद्दार आहेत. लोक यांना मातीत गाढल्याशिवाय राहणार नाहीत”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

’50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलं’

“खूप वर्षांनी मी सांगलीत आलोय. सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी स्वागत केलं. यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते. शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले हे परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की जगात कुठली गोष्ट लोकप्रिय झाली नाही आणि वाऱ्यासारखी पसरली नाही. पण आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण 50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे यांच्या घशात घातली’

“मुख्यमंत्र्यांविषयी बोलणं योग्य नाही. सन्मान राखला पाहिजे. पण जर जनतेच्या भावना असतील तर मी काही बोलणार नाही. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिंदे आणि चाळीस चोरांनी, दिल्लीच्या रंगा बिल्लांनी काय समजलं? निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला.

“शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचं आहे. महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे. त्यासाठी सांगलीचा वाटा पहिजे. काही घटकेचे सरकार आहे. आधी 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. हिमतीचा सागर तो कसा आटणार?”, असं राऊत म्हणाले.

“वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठिशी होते. भाजपने पाठीत खंजीर खपूसले. हे भांडण आता 40 चोरांशी नाही, भाजपशी आहे”, असं देखील राऊत म्हणाले.

‘भाजपला गावात पोस्टर लावायला दोन माणसे मिळत नव्हती’

“भारतीय जनता पार्टीला गावात पोस्टर लावायला दोन माणसे मिळत नव्हती. त्यांना आपण खांद्यावर घेऊन मिरवलं. आता त्याच खांद्यावर अंतयात्रा. याची महाराष्ट्र वाट बघतोय. या महाराष्ट्राला उत्तम असं नेतृत्व महाराष्ट्राने दिलं. मात्र कोरोनाचा काळ आला आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या सर्वांचे प्राण उद्धव ठाकरे यांनी वाचवले. आणि दुर्दैवाने ठाकरे आजारी पडले. आणि त्याचा गैरफायदा घेऊन या भाजपने हे सरकार पाडले. असे महाराष्ट्रात कधी घडले नाही. अशी निर्घृण माणसे सत्तेवर बसले आहेत याचा बदला आपण घेतला पाहिजे”, असं आवाहन राऊतांनी केलं.

“तुमची झुंडशाही मोडायची असेल तर आमची गुंडशाही चालेल. त्यामुळे परत एकदा रस्त्यावरच उतरावे लागेल आणि त्याच रस्त्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेचा बाण उभा करावा लागेल”, असंही ते यावेळी म्हणाले.

“आज महाराष्ट्रात काय चालू आहे? सर्व उद्योग बाहेर जात आहेत. याची लाज मुख्यमंत्र्यांना वाटली पाहिजे. आज आपल्याकडे धनुष्यबाण चिन्ह नाही. पण खरे हे इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. ही कसली लक्षणे? कारण चोर गेले पण जनता आमच्यासोबत आहे. सांगलीमध्ये मी परत येणार, पण फडणवीसांसारखा नाही. चिन्हाचं काय घेऊन बसला राव. पण धनुष्यबाण आमच्या छाताडावर आहे. आम्ही तर ठिणगी टाकतो, पण आता तर हातात मशाल आली आहे”, असं राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.