काँग्रेसमधील बड्या नेत्याची मविआतून हकालपट्टी करा, ठाकरे सेनेची मागणी, अन्यथा…

प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केली नाही तर शिवसेना आगामी काळातील निवडणुकीत आंदोलने शिवसेनेच्या स्टाईलने करेल, असे शरद कोळी यांनी म्हटले. महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला होता. मात्र उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस उभा राहिली. मात्र काही नेत्यांना पंख आले आणि ते उडायला लागले.

काँग्रेसमधील बड्या नेत्याची मविआतून हकालपट्टी करा, ठाकरे सेनेची मागणी, अन्यथा...
maha vikas aghadi
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 2:36 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच झटका बसला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला मिळून ५० जागाही मिळाल्या नाही. त्याचे खापर आता एक, दुसऱ्यावर फोडले जात आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २० तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. शरद पवार यांची राष्ट्रवादी दहा जागांवर थांबली. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर येऊ लागले आहे. आता सोलापूरमधील ठाकरे सेनेने थेट खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढवू, असा इशारा दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केल्यानंतरच महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू. अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवू.

का आहेत प्रणिती शिंदेंवर नाराजी

खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर शिवसेना उबाठाचा पराभव झाला, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे. प्रणिती शिंदे यांच्यासारखे गद्दार लोक महाविकास आघाडीत असतील तर एकत्र लढणे अवघड आहे. महाविकास आघाडीतून खासदार प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा तसेच काँग्रेसने त्यांची खासदारकी रद्द करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा

प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी केली नाही तर शिवसेना आगामी काळातील निवडणुकीत आंदोलने शिवसेनेच्या स्टाईलने करेल, असे शरद कोळी यांनी म्हटले. महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झालेला होता. मात्र उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस उभा राहिली. मात्र काही नेत्यांना पंख आले आणि ते उडायला लागले. मात्र त्यांचे पाणी किती ते आता त्यांना कळले. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून त्यांच्या काही नेत्यांनी भाजपचे काम केले. त्यापैकीच खासदार प्रणिती शिंदे या देखील आहेत. त्यामुळे अशा गद्दार लोकांची तात्काळ हकालपट्टी करावी, असे शरद कोळी यांनी म्हटले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.