Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरे यांना मध्यावधी निवडणुकीची शंका, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष असताना उद्धव ठाकरेंनी वेगळीच शक्यता बोलून दाखवलीय. राज्यात मध्यावधी निवडणुकात होतील, असं उद्धव ठाकरेंना वाटतंय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | उद्धव ठाकरे यांना मध्यावधी निवडणुकीची शंका, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:33 PM

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थेट मध्यावधीचीच शक्यता लागू केली आणि पुन्हा मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरु झालीय. चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन भाषण केलं. त्यात उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणुकीवर बोलले. आता मध्यावधी निवडणुकीची शक्यता उद्धव ठाकरेंना का वाटतेय? तर त्याचं कारण सुप्रीम कोर्टातली अपात्रतेसंदर्भातली सुनावणी! सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाची आहे. घटनापीठासमोर सलग सुनावणी सुरु आहे.

एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाले तरच सरकार कोसळेल आणि सरकार कोसळल्यास मध्यावधी निवडणुका होतील. पण उद्धव ठाकरेंना मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना तशी शक्यता वाटत नाही.

मध्यावधी तेव्हा लागतात जेव्हा सरकार बहुमत गमावतो आणि विरोधकही बहुमत सिद्ध करु शकत नाहीत. सत्तांतरानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीत शिंदे सरकारच्या पाठीशी 164 आमदारांचं पाठबळ सभागृहात दिसलंय. सध्या भाजपकडे 106 आमदार आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदेंच्या शिवसेनेकडे 40 आणि अपक्ष 10 असे 50 आमदार आहेत. आणि इतर अपक्ष 8 असे एकूण 164 आमदारांचं संख्याबळ भाजप-शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. तर ठाकरे गटाकडे 15 आमदार, काँग्रेसचे 44 आमदार आणि राष्ट्रवादीचे 55 आमदार असं महाविकास आघाडीकडे 114 आमदार आहेत. म्हणजेच शिंदे-फडणवीसांचं सरकार मजबूत आहे.

दुसरीकडे सरकार पडणारच नाही, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. तिथं आम्ही कायदेशीर लढाई जिंकलोय, असं शहाजी बापू म्हणतायत. उद्धव ठाकरेंना मध्यावधीचा अंदाज वाटतोय. पण शरद पवारांना तसं वाटत नाहीय. अर्थात अंदाज अपना अपना असतो. मात्र सध्या विधानसभेतली आकडेवारी शिंदे-फडणवीसांच्याच बाजूनं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.