Rajyasabha election result : अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी हात केले वर, शिवसेनाच संजय पवार यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे सूचक वक्तव्य?

अपक्षांचे मॉनिटरिंग शिवसेना करीत असल्याचे सांगत, शिवसेनेच्या तिसऱ्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचे संकेतच यानिमित्ताने जयंत पाटील यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभव केला.

Rajyasabha election result : अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांनी हात केले वर, शिवसेनाच संजय पवार यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे सूचक वक्तव्य?
Jayant Patil
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 9:13 PM

पंढरपूर – राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha election)झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील (MVA)मतभेद समोर येताना दिसत आहेत. अपक्षांच्या संपर्कात शिवसेना होती, अस वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी केले आहे. यामुळे झालेला पराभव हा शिवसेनेमुळे झाल्याचे त्यांनी या वाक्यातून सूचित केले असल्याचे दिसते आहे. अपक्षांचे मॉनिटरिंग शिवसेना करीत असल्याचे सांगत, शिवसेनेच्या तिसऱ्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचे संकेतच यानिमित्ताने जयंत पाटील यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभव केला. पाच ते सहा अपक्षांनी महाविकास आघाडीला मान्य केले नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी नावे सांगणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी या सहा आमदारांची नावे उघड केली होती.

दुसऱ्या पसंतीच्या मतांनी घात केला – जयंत पाटील

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची य निवडमुकीत झालेली चूकही सांगितली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांकडे लक्ष दिले असे त्यांनी सांगितले. मात्र त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांनी घात केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पराभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला गांभिर्याने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांचा झालेला पराभव गांभिर्याने घेतला आहे. शनिवारी संध्याकाळी अनिल परब, एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी वर्षा निवासस्थानी नेमके काय घडले याचा आढावा घेतला. आगामी विधानपरिषदांच्या मतदानातही भाजपाने एक उमेदवार जास्त दिला आहे, आता त्या निवडणुकीत तरी हा प्रकार होऊ नये, याकडे आता मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे लक्ष असेल. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्या बैठकीतही नेमका कुठे दगाफटका झाला, याची चर्चा केली. तसेच विधान परिषदेबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

उमेदवार राष्ट्रवादीचा असता तर पराभव झाला नसता-सुजय विखे पाटील

तर दुसरीकडे भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उमेदवार शिवसेनेचा असल्यानेच पराभव झाल्याचे सांगितले आहे. हाच उमेदवार राष्ट्रवादीचा असता तर पराभव झाला नसता, असे त्यांचे म्हणणे आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.