नाशिकचा शिवसेनेचा उमेदवार ठरला, हेमंत गोडसे किंवा भुजबळ नाही…या पदाधिकाऱ्यास ग्रीन सिग्नल

nashik lok sabha constituency: गेल्या चार दिवसांपासून अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अजय बोरस्ते यांना सेनेकडून चाल मिळाली आहे. यामुळे महायुतीचा नाशिकचा तिढा सुटला आहे.

नाशिकचा शिवसेनेचा उमेदवार ठरला, हेमंत गोडसे किंवा भुजबळ नाही...या पदाधिकाऱ्यास ग्रीन सिग्नल
छगन भुजबळ, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 9:25 AM

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला दिसत आहे. शिवसेनेची असलेली ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. परंतु शिवसेनेकडून विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास नाशिक लोकसभेचे तिकीट मिळणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोरस्ते यांना बोलावणे आले आहे. यामुळे आता अजय बोरस्ते ठाण्याकडे रवाना झाले आहे.

अशी पडली नावे मागे

नाशिक लोकसभेच्या जागेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार? यासंदर्भात वेगवेगळी नावे येत होती. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावे यासाठी दोन वेळा शक्तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु त्यांच्या नावाला विरोध होत होता. मग राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. परंतु त्यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ आणि सकल मराठा समाजाकडून उघड विरोध दर्शवला गेला. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. आता गेल्या चार दिवसांपासून अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अजय बोरस्ते यांना सेनेकडून चाल मिळाली आहे. यामुळे महायुतीचा नाशिकचा तिढा सुटला आहे.

अजय बोरस्ते भाजप ते शिवसेना प्रवास

अजय बोरस्ते यांची कारकीर्द भाजपमधून सुरु झाली. त्यांनी अभविप विद्यार्थी संघटनेत काम करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर भाजप युवा मोर्चात दाखल झाले. परंतु भाजपनंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली. बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेत नगरसेवक झाले. शिवसेनेचे महानगरप्रमुख, नाशिक महापालिकेत गटनेता, विरोधी पक्ष नेता या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

हे सुद्धा वाचा

बंडानंतर एकनाथ शिंदेसोबत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेने बंड केले. त्यानंतर अजय बोसस्ते यांनी नाशिकमधून २२ नगरसेवक आणि हजारो शिवसैनिकांसोबत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.