पत्रकाराची हत्या; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला नवे वळण लागले आहे. (shivaji kardile targets minister of state prajakt tanpure over journalist murder)

पत्रकाराची हत्या; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री गोत्यात?
shivaji kardile
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 8:59 PM

नगर: राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला नवे वळण लागले आहे. ज्या भूखंडाच्या वादातून दातीर यांची हत्या झाली तो भूखंड राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार शिवाजी कार्डिले यांनी केला आहे. कार्डिले यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून त्यामुळे तनपुरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (shivaji kardile targets minister of state prajakt tanpure over journalist murder)

राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांचं 6 एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी माळी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने दातीर यांच्या हत्येची कबुलीही दिली आहे. तसेच तनपुरे यांच्या कंपनीच्या भूखंडाच्या वादातूनच हत्या करण्यात आल्याची कबुली या संशयित आरोपीने दिल्याची माहिती शिवाजी कार्डिले यांनी दिली. कार्डिले यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणाची सर्व माहिती दिली.

जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती

राहुरी तालुक्यातील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे 6 एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोडवरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी ही केली होती, असं कार्डिले यांनी म्हटलं आहे.

302 लावा

अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या कबुली जबाबात राहुरी लगतच्या भूखंडाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या 18 एकर भूखंडाच्या उताऱ्यावर ज्यांची ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा. तनपुरे कुटुंब हे नगरपालिकेच्या माध्यमातून जागांवर आरक्षण टाकून जागा बळकावण्याचे काम करत आहे. आधी भूखंडावर आरक्षण टाकायचे, नंतर तो भूखंड विकत घेऊन नंतर त्यावरचे आरक्षण उठवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करतानाच या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याला अटक केल्यास या कटामागील मुख्य सूत्रधारांचा तपास लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासा

पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या 18 एकरच्या या भूखंडाच्या खरेदी विक्री व ताब्याबाबत वेळोवेळी उपोषण केलं होतं. कोर्टातही गेले होते. तसेच बातम्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. या गुन्हयातील संशयित आरोपी कान्हू गंगाराम मोरेला राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे . घटना घडण्यापूर्वी काही दिवस आरोपी कोणाच्या संपर्कात होते, संबधित खुनाचा कट कसा शिजला याबाबत संशयित आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर तपासले जावेत तसेच मोबाईलचे लोकेशन तपासावे. अपहरण झाले त्यावेळी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, या प्रकरणी दातीर यांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वेगवेगळया याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत चौकशी व्हावी व वादग्रस्त 18 एकर क्षेत्रावरील मालकी हक्क असणाऱ्या संबधित व्यक्तींचाही दातीर हत्याप्रकरणात सहभाग असल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तर आंदोलन करू

याबाबत महत्वाचे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असून तपास कामी मागणी केल्यास सादर करण्यात येतील. या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या सर्वाचा सखोल तपास करण्यात यावा. सर्व आरोपीना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे, अन्यथा तीव्र स्वरूपांचे आदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत दातीर कुटुंबांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. पोलीस अधीक्षकांना निवेदन देतेवेळी कार्डिले यांच्यासोबत शरद बाचकर, नानासाहेब जुधारे, अनिल दौंड, आरिफ बागवान, गणेश खैरे, बाबासाहेब शिंदे, नवनाथ कोळसे, बबन कोळसे, अविनाश बाचकर, प्रभाकर हरिष्चंद्रे, शरद उदावंत, नारायण धोंगडे तसेच आदी उपस्थित होते. (shivaji kardile targets minister of state prajakt tanpure over journalist murder)

फडणवीसांना निवेदन देणार

राहुरी येथील ही अठरा एकर जमीन एका शेतकऱ्याच्या नावाने होती. त्यावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. मात्र, हा भूखंड विकत घेतल्यानंतर त्यावरचं आरक्षण उठवण्यात आलं. त्यावर सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी असा बोर्ड टाकण्यात आला. या कंपनीची माहिती घेतली असता ती तनपुरे यांच्या मुलाच्या नावे असल्याचं आढळून आलं. त्यामुळे या जागेबाबत दातीर यांनी आवाज उठवून या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यामुळेच बहुधा दातीर यांची हत्या झाली असावी, असा संशय असून या प्रकरणातील सर्वांची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. देशमुख हा तनपुरेंचा मेव्हणा आहे. त्याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतचे एक निवेदन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा निवेदन देणार असून त्यांनाही या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. (shivaji kardile targets minister of state prajakt tanpure over journalist murder)

संबंधित बातम्या:

VIDEO: मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, उदयनराजेंचं हटके स्टाईल कटोरा आंदोलन, चिल्लर दिल्यावर म्हणाले, दहाची नोट टाक!

अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अत्यंसंस्कार

मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर व्यापाऱ्यांची सबुरीची भूमिका; पुण्यातील आंदोलन मागे

(shivaji kardile targets minister of state prajakt tanpure over journalist murder)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.