एका हुंडीसाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या इंग्रजांना आणले होते जेरीस, काय घडलं होतं त्यावेळी…
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा विकास करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. पण, त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज हे मुंबई जवळील भागात सत्ता गाजवीत होते. तर, दुसरीकडे पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यासाठी शिवाजी महाराज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यात चढाओढ सुरु होती. त्यामुळे इंग्रजांनासुद्धा त्यामध्ये नाईलाजाने उतरावे लागले.

मुंबई : इ. स. 1688 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. याच काळात इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसरा याला पैशाची अत्यंत गरज होती. त्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून 50 हजार पौंड इतके कर्ज घेतले होते. त्यासाठी त्याने सहा टक्के व्याज देण्याचीही तयारी दाखविली होती. मात्र पुढे त्याला हे कर्ज फेडणे अशक्य झाले होते. त्यामुळे राजा चार्ल्स याने ईस्ट इंडिया कंपनीला 10 पौंड इतक्या नाममात्र भाड्यावर मुंबई बेट सर्व हक्कांनिशी दिले. मुंबई ताब्यात आल्यावर पुढे ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास आणि कलकत्ता ही बंदरे घेतली. मद्रास घेण्यासाठी कंपनीने राजा चंद्रगिरी यांना 1200 होन दिले. तर, बंगालच्या नबाबाला वार्षिक भाडे 1200 रुपये देऊन कलकत्ता घेतले. मात्र, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तीन बंदरापैकी मुंबई हे कंपनीसाठी सर्वात भरभराटीचे बंदर ठरले. ...