“शिवाजी महाराजांनी बुद्धी, शक्तीने राज्य केलं, मुलांनी तानाजी मालुसरे व्हावं,” सिंहगड सर केल्यानंतर राज्यपालांचे उद्गार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत राहिलाय. त्यांनी सुरुवातीला बाबासाहेब पुरंदरेची भेट घेतली. नंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवत सिंहगड किल्ला सर केला.

शिवाजी महाराजांनी बुद्धी, शक्तीने राज्य केलं, मुलांनी तानाजी मालुसरे व्हावं, सिंहगड सर केल्यानंतर राज्यपालांचे उद्गार
Governor-BhagatSinh-Koshyari-At-Sinhgad
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 6:29 PM

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत राहिलाय. त्यांनी सुरुवातीला बाबासाहेब पुरंदरेची भेट घेतली. नंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवत सिंहगड किल्ला सर केला. वयाच्या 80 व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा उत्साह आज राज्यपालांमध्ये संचारला होता. त्यानंतर राज्यपालांनी शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) बुद्धी आणि शक्तीने राज्य केलं. तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) मुलांना समजायला हवेत. मुलांनी तानाजी मालुसरे व्हावं, असे उद्गार काढले. (Shivaji Maharaj ruled with intellect and strength children should become Tanaji Malusare said Governor Bhagat Singh Koshyari)

शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे हिरो

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर होते. काही विशेष कारणांमुळे कोश्यारी यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला. राज्यपालांनी बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेऊन शिवसृष्टीची पाहणी केली. त्यानंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवत सिंहगडाची पाहणी केली. एकीकडे पर्यटकांना बंदी असताना राज्यपालांनी मात्र सिंहगड दौरा पूर्ण केला. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्याविषयी भाष्य केलं. “माझ्या राजकीय जीवनात शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती, बुद्धी, शक्तीचं गुणगान इतिहासकारांनी केलं आहे, युक्ती, बुद्धी आणि शक्तीने शिवाजी महाराजांनी राज्य केलं. शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे हिरो आहेत. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे. तो शिक्षणात आला पाहिजे. मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजेत”, असं राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल येणार्‍या मार्गावर आकर्षक रांगोळ्या 

यावेळी सिंहगड परिसरात राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच महिलांनी त्यांचे औकक्षण केले. यावेळी राज्यपालांनाही नम्रपणे हात जोडून नमस्कार करत हसत हसतच स्थानिकांकडून करण्यात आलेलं स्वागत स्वीकारलं. यावेळी बोलताना आमच्या उत्तराखंडमध्येही असेच गड आहेत, असे राज्यपालांनी स्थानिकांना सांगितलं.

शिवनेरी किल्ला पायी चालत केला होता सर 

दरम्यान, यापूर्वी राज्यपालांनी 16 ऑगस्ट 2020 रोजी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी वयाच्या 79 व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला होता. पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले होते. त्यानंतर आज कोश्यारी यांनी सिंहगड किल्ला सर केला आहे.

इतर बातम्या :

Sharad Pawar | 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे : शरद पवार

मॅटचा आदेश, पण बदली होत नाही, पोलीस निरीक्षकाची महासंचालक संजय पांडे यांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

हिंगोलीत शिवसेनेला पालकमंत्र्यांचं वावडं? वर्षा गायकवाडांच्या सर्व कार्यक्रमांकडे शिवसेना नेत्यांची पाठ

(Shivaji Maharaj ruled with intellect and strength children should become Tanaji Malusare said Governor bhagat singh Koshyari)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.