… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, असं सांगतानाच आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज स्पष्ट केलं.

... तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 2:09 PM

सातारा: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, असं सांगतानाच आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजाने घाबरू नये, असं आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज स्पष्ट केलं. इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (shivendra raje bhosale reaction on maratha reservation)

आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरू आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे, असं सांगतानाच राज्य सरकारने एमपीएससीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती नको

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक करू नये. आपण वेगवेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सावधानतेचा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं नेहमी बोललं जातं. मराठा समाजातील असलेल्या दुफळी असल्यामुळे असं बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्रं आलं पाहिजे, असं सांगतानाच मी इथे राजे किंवा आमदार म्हणून आलो नाही. तर एक मराठा म्हणून या गोलमेज परिषदेला उपस्थित आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असं सांगतानाच यावेळी मात्र इतिहास तुम्हाला पुन्हा माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणाऱ्यांनाच समितीत संधी देण्यात यावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही. कोणत्याही मागणीवर आणि विषयावर सरकार गंभीर नाही. मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शरद पवारांनी लक्ष घालावं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षाचं सरकार बनवण्यात लक्ष घातलं. आता त्यांनीच पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास उरलेला नाही, असंही ते म्हणाले. राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती झाली. पण मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ही भरती थांबवण्यात आली होती. पण आता सहा हजार नियुक्त्या करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप करतानाच ही निवड प्रक्रिया थांबवण्यात यावी, अन्यथा मेट्रो कार्यालयात घुसून ही प्रक्रिया बंद पाडल्या जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (shivendra raje bhosale reaction on maratha reservation)

संबंधित बातम्या:

…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे…

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील

मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

(shivendra raje bhosale reaction on maratha reservation)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.