जिंकलत भावांनो! बदलणारं वातावरण, हवेची गती, काळ्या कातळाचे तुटणारे कडे सोसत लिंगाणा सर

समुद्र सपाटीपासून 3 हजार 100 फुटांवर उंचीवर हा दुर्ग आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते (Shivneri Trekkers climbed Lingana Fort).

जिंकलत भावांनो! बदलणारं वातावरण, हवेची गती, काळ्या कातळाचे तुटणारे कडे सोसत लिंगाणा सर
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 11:23 PM

मुंबई : लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. ‘माणगड’, ‘सोनगड’, ‘महिंद्रगड’, ‘लिंगाणा’, ‘कोकणदिवा’ हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर जणू पहारे देण्यासाठीच उभे आहेत. इथल्या घाट वाटांवरून सह्याद्रीमार्गे खाली कोकणात उतरता येते. या पर्वत रांगेत बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका असल्याने त्याला लिंगाणा हे नाव पडले आहे (Shivneri Trekkers climbed Lingana Fort).

जसे रायगड स्वराज्याची राजधानी म्हटले जाते, तसे लिंगाण्याला स्वराज्याचा कारागृह म्हणून ओळखले जाते. कैद्यांनी पळून जाऊ नये, म्हणून त्यांना इथे ठेवले जायचे. त्यावरुनच हा किल्ला किती दुर्गम आहे, याची कल्पना येते. हाच किल्ला आता पुण्यातल्या शिवनेरी ट्रेकर्सनं सर केलाय (Shivneri Trekkers climbed Lingana Fort).

चढाईस अतिशय दुर्गम किल्ला

समुद्र सपाटीपासून 3 हजार 100 फुटांवर उंचीवर हा दुर्ग आहे. चढाई अतिशय दुर्गम असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्वात अवघड ट्रेकमध्ये याची गणना होते. या किल्ल्यावरुन थेट राजगड आणि रायगडाचे दर्शन होते. लिंगाणाच्या बाजूला माणगड, सोनगड, महिंद्रगड आणि कोकणदिवा हे किल्ले पाहारा देत उभे आहेत. महाराज्यांच्या काळात सह्याद्रीच्या घाटावरुन कोकणात उतरणाऱ्या वाटांवर इथूनच लक्ष ठेवले जायचे.

शिवनेरी ट्रेकर्समधील सदस्याचा हा उत्साहच, लिंगाणा काय आहे हे सांगून जातो. लिंगाण्यावर चढाई करणारे अनेक विक्रम याआधीही झालेत. मात्र, प्रत्येकवेळी बदलणारं वातावरण, हवेची गती आणि काही वेळा काळ्या कातळाचे तुटणारे कडे लिंगाण्यावरील चढाई थरारक बनवतात. त्यामुळे प्रशिक्षित ट्रेकर्सनाही हा सर करणे मोठे आव्हानच असते.

गिरीरोहणाचा विलक्षण आनंद

अर्थात कठीण चढाईच्या या सुळक्यावर जायचे, तर खूप तयारी लागते. यावर जाणारी वाट पूर्णत: निसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढाई करता येते. सहाजिकच गिर्यारोहणाच्या साधनांशिवाय या सुळक्याला हात लावता येत नाही. या सुळक्याला सर करायला जवळपास 3 ते 4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे, मध्ये फक्त एचक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर एक विलक्षण आनंद मिळतो. या सुळक्यावरून पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड दिसतो.

“लिंगणा सर करुन शिवनेरी ट्रेकर्स गृप आनंदी झाला आहे. मी सर्वांना मीस करतोय. पुढच्यावेळी शिवनेरी ट्रेकर्सची पूर्ण टीम असेल. थोड्या दिवसात आम्ही सगळ्यांना घेऊन येऊ. मी खूप आनंदी आहे. मी इथे येण्याबाबत आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नाही”, अशी प्रतिक्रिया शिवनेरी ट्रेकर्सच्या एका सदस्याने दिली.

हेही वाचा : …तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू; बच्चू कडूंनी भरला दम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.