‘शिवराज्याभिषेक दिन’ सर्व महाविद्यालयांत साजरा होणार, ठाकरे सरकारच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंकडे सुपूर्द
संभाजीराजे यांनी उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली.
मुंबई : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाची जय्यत तयारी सुरु आहे. यावर्षीपासून राज्यातील सर्व महाविद्यालये, खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. त्याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती उदय सामंत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिवराज्याभिषेक दिनाबाबतच्या अध्यादेशाची प्रत संभाजीराजेंना देण्यात आली. त्यामुळे 6 जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन यंदा राज्यभरात साजरा केला जाणार आहे. (ShivRajyabhishek Din will be celebrated in all universities and colleges in the state)
राज्यातील सर्व महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्येही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याबाबत ठाकरे सरकारकडून अध्यादेश काढण्यात आलाय. या दिवशी शिवकालीन विषयांवर महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती सामंत यांनी दिलीय. राज्य सरकारच्या या उपक्रमाबद्दल आभार मानतानाच संभाजीराजे यांनी या निर्णयाचं स्वागतही केलंय. हा दिवस खरंतर राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा. महाराजांच्या कर्तृत्वाची माहिती आजच्या पिढीला मिळायला हवी. महाराजांच्या आजार आणि विचारांचा प्रसार व्हायला हवा. ही त्याचीच सुरुवात असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले.
शिवराज्याभिषेक दिवस राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये,अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय @YuvrajSambhaji यांच्याकडे सुपुर्द केला. pic.twitter.com/2OKtRngqyK
— Uday Samant (@samant_uday) June 3, 2021
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य व्हायचंय?
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडले जाण्यासाठी संभाजीराजे यांनी एक लिंक ट्वीट केली आहे. त्यामाध्यमातून शिवराज्याभिषेक महोत्सव समितीसोबत जोडलं जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. “शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या. त्याच ध्येय उद्देश्याने शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्य करत आहे. समिती सोबत जोडून कार्य करण्यासाठी पुढील लिंक वरती आपली संपूर्ण माहिती भरावी”, असं आवाहन संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. संभाजीराजे यांनी दिलेली लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeU9fLmxPm-Hvy_Nvmm3Rg-LXFAIxVPk_V8SYabIhhW_SPpRw/viewform
शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्यत्व सुरू करण्याची इच्छा हजारो शिवभक्तांनी व्यक्त केली, त्याप्रमाणे पुढील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 2, 2021
ठाकरे सरकारला अल्टिमेटम
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला अजून 5 गोष्टी सांगितल्या आहेत. या 5 गोष्टींवर 7 जूनपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही कोरोना वगैरे पाहणार नाही. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. मी स्वत: या आंदोलनात उतरणार अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचं वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Maharashtra Lockdown Update : राज्यात लॉकडाऊन की अनलॉक? सरकारमधील संभ्रमावस्थेवर फडणवीसांसह भाजप नेत्यांचा हल्लाबोल https://t.co/JDak0QVx9C @OfficeofUT @VijayWadettiwar @Dev_Fadnavis @mipravindarekar @BhatkhalkarA #maharashtralockdown #lockdown #UNLOCK #maharashtraunlock
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021
संबंधित बातम्या :
ShivRajyabhishek Din will be celebrated in all universities and colleges in the state