Yavatmalच्या महागाव आणि मारेगावमध्ये Shivsena आणि BJPची युती
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव आणि मारेगाव नगर पंचायतीवर (Nagar panchayat) शिवसेनेचा (Shivsena) झेंडा फडकला आहे. महागावच्या नगराध्यक्षपदी करुणा नारायण शिरभिरे यांची वर्णी लागली आहे.
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव आणि मारेगाव नगर पंचायतीवर (Nagar panchayat) शिवसेनेचा (Shivsena) झेंडा फडकला आहे. महागावच्या नगराध्यक्षपदी करुणा नारायण शिरभिरे यांची वर्णी लागली आहे. मारेगाव नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे डॉ. मनीष मस्की लागली आहे. दरम्यान येथे शिवसेनेला भाजपाने साथ दिली. त्यामुळे महाविकास आघाडीला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे. जिल्यात महाविकास आघाडी करण्याच्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशाला स्थानिक नेत्यांनी हरताळ फासला आहे. याप्रकरणी स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यवतमाळमधील सहापैकी चार नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर इतर दोन नगरपंचायतींवर काँग्रेसने बाजी मारली आहे. येथे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड मतभेद असल्याने शिवसेनेने आमच्याकडे प्रस्ताव दिल्याचा दावा येथील नेते करत आहेत. दरम्यान शिवसेने भाजपाने चार तर काँग्रेसने दोन अशा ठिकाणी विजय प्राप्त केला आहे.
Latest Videos