Uddhav Thackeray LIVE | मी फकीर, झोळी वगैरे असलं काही म्हणणार नाही, उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच मोदींवर थेट टीका

मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत आहे. पाय रोवून मी उभा आहे. हे काही थोतांड नाही. मै तो फकीर हूँ. झोली उठाके वगैरे अशी कर्मदरीद्री विचार आमचे नाहीत," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आले आहे.

Uddhav Thackeray LIVE |  मी फकीर, झोळी वगैरे असलं काही म्हणणार नाही, उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच मोदींवर थेट टीका
UDDHAV THACKERAY
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 7:47 PM

मुंबई : “शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं तरी मी राजकारणाच्या बाजूला झालो असतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री देणारच हे वचन पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत आहे. पाय रोवून मी उभा आहे. हे काही थोतांड नाही. मै तो फकीर हूँ. झोली उठाके वगैरे असे कर्मदरीद्री विचार आमचे नाहीत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका केली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर राजकारणाच्या बाजूला

“काही लोकांना अजूनही वाटतं की मी मुख्यमंत्री आहे. तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन पूर्णपणे पाळलं असतं तर मुख्यमंत्री राहिलेही असता. आज नाही तर उद्या तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री झाले असता. मी मुख्यमंत्री हे पद जबाबदारीने स्वीकारलेलं आहे. ही जबाबदारी मोठ्या विचाराने घेतली आहे. त्यांनी वचन पाळलं असतं आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर मी राजकारणाच्या बाजूला झालो असतो. माझ्यावर एक जबाबदारी आहे. ती मी पार पाडणारच आहे. मै तो फकीर हूँ झोली उठाके…. असे कर्मदरीद्री विचार आमचे नाहीत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेतृत्व तसेच मोदी यांना सुनावलं.

आपलीच माणसं ऐकत नसतील तर मेळावेतरी कशाला?

तसेच पुढे बोलताना त्यांनी आज झालेला आरएसएसचा दसरा मेळावा तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यांना घेऊन भाजपवर सडकून टीका केली. “सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर हे मेळावेतरी कशाला?,” असा सवाल त्यांनी केला.

इतर बातम्या :

Uddhav Thackeray LIVE : तर मी राजकीय जीवनातून बाहेर पडलो असतो, ‘त्या’ दगाबाजीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठवाड्याला अनोखे गिफ्ट, मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मान्यता

Shivsena Dussehra Melava 2021 | कुठल्या 5 गोष्टी आहेत ज्या उद्धव ठाकरेंना प्रत्येक जन्मात हव्यात?

(shivsena dussehra melava 2021 CM uddhav thackeray criticizes bjp over election and maharashtra cm candidature)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.