शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची तीन तास चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान या प्रकरणी अडसूळ यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. (Anandrao Adsul ED inquiry)
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची ईडीने सुमारे तीन तास चौकशी केली. आंनदराव अडसूळ अध्यक्ष असलेल्या सिटी को-ऑप बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या घोटाळ्याबाबत अडसूळ यांची आज चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे या अडसूळ यांना याबाबत पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (Shivsena Leader Anandrao Adsul Again inquiry From ED)
आनंदराव अडसूळ हे को-ऑप क्षेत्रातील मोठं नाव आहे. राज्यातील सर्व सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांची युनियन आहे. आनंदराव अडसूळ हे गेल्या अनेक वर्षांपासून या युनियनचे नेतृत्व करतात. मुख्य म्हणजे अडसूळ यांची ही स्वतःची सहकारी बँक होती. सिटी कॉ-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. तर त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होता. मात्र ही बँक आता गेल्या दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे.
कर्ज वाटपात अनियमितता आणि एन पी ए मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. बँकेचे काही हजार सदस्य होते. अनेक पेन्शनर खातेदार होते. पण सारेच बुडाले. याबाबत खातेदारांनी, ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली. पण आनंदराव अडसूळ यांनी कुणाचंच ऐकलं नाही. यामुळे अखेर खातेदारांनी पोलिसात तक्रार केली.
आपले पैसे परत मिळावेत म्हणून विनंती केली. मात्र, गेल्या दीड वर्षात खातेदारांना आपले पैसे मिळाले नाहीत. अनेक लोकप्रतिनिधींनी सीबीआय, आरबीआय, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल ईडीने घेतली. सध्या ईडीकडून याच प्रकरणाची चौकशी सुरु आहे. याच अनुषंगाने अडसूळ यांना चौकशीसाठी बोलावलं होतं.
ईडीकडून आज झालेल्या चौकशीत त्यांना या घोटाळ्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्याकडून त्यांची जवळपास 3 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी अडसूळ यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?
आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.
अडसूळ यांची आणखी एका प्रकरणाची चौकशी
आनंदराव यांची आणखी एका प्रकरणात ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पीएमसी बँकेत आहे. पी एम सी बँकेत 5500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. वाधवा बंधू यांनी हा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातील पैसे प्रवीण राऊत यांच्या मार्फत आनंदराव अडसूळ यांच्या संस्थेच्या खात्यात जमा झाले आहेत. या प्रकरणात ही लवकरच अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत आनंदराव अडसूळ?
– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार – 1996 पासून पाच वेळा खासदारकी – शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश – गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का (Shivsena Leader Anandrao Adsul Again inquiry From ED)
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर
मोठी बातमी: वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार