AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, बेपर्वा गृहमंत्री आहेत कुठे ? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : बदलापूर घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री कुठे आहेत माहीत नाही. ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही अशी बेपर्वाई असणारे गृहमंत्री आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत, बेपर्वा गृहमंत्री आहेत कुठे ? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 1:36 PM

राज्यात संवेदनाहीन सरकार बसलं आहे, लोकांना गृहीत धरून चालत नाही. एवढी मोठी घटना घडली, राज्याचे गृहमंत्री तर कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. गृहमंत्री कुठे आहेत माहीत नाही. ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही अशी बेपर्वाई असणारे गृहमंत्री आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

बदलापूरमधील शाळेत चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शहरातील तसेच राज्यातील वातावरणही पेटले आहे. शहरातील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते, तरी गृहमंत्री, मुख्यमंत्री तिकडे फिरकले नाहीत, यावरूनच उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दोष फक्त पोलिसांचा नव्हे तर…

सर्व दोष पोलिसांचा नाही. त्यांच्यावर दबाव आणणारे जबाबदार आहेत. पोलीस आयुक्त करतात काय. त्यांच्या कार्यक्षेत्रात काय होतंय हे त्यांना कळलं पाहिजे. आंदोलन करावं लागलं, शिवसैनिक तिकडे होते. सुषमा अंधारे तिथे बसल्या होत्या तक्रारीची दखल घेतली असती तर हा प्रकार झाला नसता. संवेदनाहिन सरकार बसलं आहे. लोकांना गृहित धरून चालत नाही. हे त्यांना कळलं पाहिजे. रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्री कुठे होते हे शोधा. मुख्यमंत्री रत्नागिरीत फिरत होते. हे किती निर्लज्जपणाचे आहे. तुम्ही दादागिरी करत असाल तर ते चिरडण्याची हिंमत बहिणींमध्ये आहे. राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत,असे त्यांनी सुनावले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका 

आमच्या अभिषेक घोसाळकर यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा आम्ही त्यांच्याकडे (गृहमंत्री देवेंद्र फडणवीस) राजीनामा मागितला होता. त्यावेळेस ते अत्यंतर निर्घृणपणे म्हणाले होते की, गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल. ज्यांना आपल्या जनतेच्या जीवाची काळजी नाही, ती बेपर्वाई असणारे गृहमंतरी आहेत, दुसरे जॅकेटवाले मंत्री कुठे आहेत तेही माहीत नाही, आणि आमचे घटनाबाह्य तर काय ढोल पिटत फिरतच आहेत. त्यामुळे या सगळयांना जमीनीवरचा आक्रोश हा कळला पाहिजे.

म्हणूनच मी परत एकदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय की कोणतंही राजकारणन आणता, आपल्या घरातल्या मुलीबाळींचं रक्षण करण्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल असं आवाहन त्यांनी केलं.

'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.