AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्या मेळाव्याचा ‘या’ मुद्द्यावरून शिवसेनेचे आजी-माजी मंत्री आमनेसामने

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दादा भुसे यांच्याकडे नाशिकमधून बीकेसीवर शिवतीर्थापेक्षा जास्त गर्दी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे.

दसऱ्या मेळाव्याचा 'या' मुद्द्यावरून शिवसेनेचे आजी-माजी मंत्री आमनेसामने
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 12:57 PM

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांच्यात दसरा मेळाव्यावरुन (Dasshara Melava) संघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री असलेले दादा भुसे यांनी तीनशे बसेस मुंबईत बीकेसीवर घेऊन जाणार असल्याचे जाहीर केले आहेत. त्यातच माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी दादा भुसे यांच्यावार हल्लाबोल केला आहे. दादा भुसे यांच्याकडे तीनशे बस घेऊन जाण्यासाठी पैसा कुठून आला असा सवाल उपस्थित करत घोलप यांनी दादाभुसे यांच्यावर कुरघोडी केली आहे. खरंतर अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. त्यात ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार असून शिंदे गटाचा बीकेसी येथे होणार आहे. दोघांकडूनही सध्या दसरा मेळाव्याचे टीझर जारी करत कुरघोडी केली जात आहे.

अशाच परिस्थितीत जिल्हा पातळीवर ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दादा भुसे यांच्याकडे नाशिकमधून बीकेसीवर शिवतीर्थापेक्षा जास्त गर्दी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

दादा भुसे यांचा असलेला मालेगाव बाह्य मतदार संघातून जास्तीत जास्त नागरिक कसे घेऊन जाता येईल यासाठी तीनशे बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.

यावरूनच शिवसेनेचे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते बबन राव घोलप यांनी याच मुद्द्यावरून भुसे यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे.

घोलप यांनी तीनशे बसेस कोठून आणल्या असा सवाल उपस्थित करत शिंदे यांचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा आणि हिंदूंचा जाज्वल्य इतिहास आणि शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठीचा मेळावा आहे.

याशिवाय हे सगळे कट कारस्थान असून केंद्रीय मंत्री अमित शहा या पाठीमागे असल्याचा बबनराव घोलप यांनी आरोप करत भुसे यांना चिमटे काढले आहे.

शिंदे गटात गेलेले चाळीस आमदार यांना शहा यांची ताकद कळणार नाही, शिवसेनेला संपविण्याचा त्यांचा डाव असून लवकर सावध व्हावे असेही घोलप यांनी म्हंटले आहे.

शिवतीर्थ येथीलच दसरा मेळावा खरा दसरा मेळावा आहे. ती एक परंपरा असून मेळावा यशस्वी होईल अशी अपेक्षा घोलप यांनी बोलून दाखवली असून बाळासाहेब ठाकरे यांनी परंपरा सुरू केली आहे.

कार्यकर्त्यांना सुचना केली आहे की, रस्ते खराब आहेत. त्यामुळे रेल्वेने जा. नाशिकहून तीन रेल्वेगाडया आहेत. त्यातून दहा हजार कार्यकर्ते हातात भगवा झेंडा घेऊन जाणार आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.