Video: माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा, कोकणाबद्दल कंठही दाटला

रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

Video: माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा, कोकणाबद्दल कंठही दाटला
शिवसेना आमदार रामदास कदम विधान परिषदेतून निवृत्त झाले
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 7:22 AM

विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. कालचा दिवस तर नितेश राणे, सुहास कांदे, भास्कर जाधव, फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजलं. पण त्याच वेळेस विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम. (Ramdas Kadam) विशेष म्हणजे दोघांनाही भाई म्हटलं जातं. रामदास कदमांनी निरोपाचं भाषण मात्र आटोपशीर केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं पण हेच सात मिनिटांचं भाषण चर्चेत राहिलं. त्याला कारण आहे ते रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं. नेमकं काय म्हणाले रामदास कदम? रामदास कदम यांनी अडीच वर्षापूर्वीच राजकारणातून रिटायरमेंट जाहीर केलीय. पण तरीही विधान परिषदेसाठी (Ramdas Kadam Vidhanparishad) ते उत्सूक असल्याची चर्चा कायम रंगली. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासोबत त्यांचा झगडा सुरु झाला. तो शेवटी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढण्यापर्यंत पोहोचला. रामदास कदम ज्यावेळेस निरोपाचं भाषण करायला उभे राहीले त्यावेळेही त्यावर त्या वादाची छाया स्पष्ट जाणवत होती. पण कदमांनी यावेळी वादावर न बोलता, माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्यावर भर दिला. एवढच नाही तर कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. ते म्हणाले- पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यासह माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्या घोषवाक्याकडे आकर्षीत होऊन मी 1970 साली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. त्याला आता 52 वर्षे होतायत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, मी स्वत:ला भाग्यवान समजतो सभापती महोदय, अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली.

शल्य काय? रामदास कदमांनी स्वत:च्या मनातलं शल्यही बोलून दाखवलं, ते म्हणाले-हे मी मुद्दाम सांगतोय, माझ्या कोकणात जी सिंचनची व्यवस्था आहे ती फक्त दीड टक्का आहे. मी अनेक वेळा प्रयत्न केले. अगदी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये हा विषय मी लावून धरला. मला सभापती महोदय, त्यात यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये आणि सर्वात अन्याय कोकणावर. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दीड टक्का आहे आणि सिंचनाचं प्रमाण मात्र 55 टक्के आहे. याचं दु:खं, शल्य माझ्या मनामध्ये आहे.

परबांसोबतच्या वादावर काय म्हणाले? गेल्या काही काळापासून मंत्री अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात धूमश्चक्री सुरु आहे. त्यात शिवसेनेचे मोठं नुकसान होताना दिसतंय. गेल्या आठवड्यात तर रामदास कदमांनी सरकारच्याविरोधात कोर्टात जाण्याचं सभागृहात जाहीर केलं. पण आजच्या निरोपाच्या वेळी मात्र त्यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले-मला पक्षानं पुष्कळ दिलं. मी अधिक बोलणार नाही आज. कधी कधी कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागतं. त्याचा विपर्यास करण्याची काही कारणं नाहीत. होतात मतभेद थोडेसे होतात, पण ते तात्पुरते असतात. माझा स्वभाव तसाच आहे, थोडासा भडक, कधी कधी चिडतो. पण प्रवीण दरेकरांनी सांगितल्याप्रमाणे तितका मवाळ देखील आहे. तितक्या जवळ आल्यानंतर माणुस कळतो.

हे सुद्धा वाचा:

Aurangabad Zoo: मिटमिट्यातील झुलॉजिकल पार्कला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी, सफारी पार्क उबारण्यातील मार्ग मोकळा

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

Suicide note | सुसाईड नोट बायकोला पाठविली, हिंगणघाटवरून आत्महत्या करण्यासाठी नागपुरात आला; पोलिसांची एंट्री झाल्यावर वेगळंच घडलं!

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.