दुकाने बंद करण्यासाठी सेना आमदार वैभव नाईकांचा व्यापारी दुकानदारांवर दबाव, Video व्हायरल

काही ठिकाणी बंदला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलाय तर काही ठिकाणी मात्रनागरिक, व्यापारी, दुकानदारांनी बंदला विरोध केलाय. तिकडे कणकवलीत मात्र बंदला विरोध करणाऱ्या दुकानदाराला सेना आमदार वैभव नाईक दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दुकाने बंद करण्यासाठी सेना आमदार वैभव नाईकांचा व्यापारी दुकानदारांवर दबाव, Video व्हायरल
वैभव नाईक, शिवसेना आमदार
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:43 PM

कणकवली : लखीमपूर खिरी इथल्या शेतकरी अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात आज बंदची हाक दिली गेलीय. या बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काही ठिकाणी बंदला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलाय तर काही ठिकाणी मात्रनागरिक, व्यापारी, दुकानदारांनी बंदला विरोध केलाय. तिकडे कणकवलीत मात्र बंदला विरोध करणाऱ्या दुकानदाराला सेना आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर

महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी 10 च्या आसपास सेना आमदार वैभव नाईक कणकवली शहरात बंदचा आढावा घेत असताना त्यांना काही दुकाने उघडी दिसली. त्यावर भडकलेल्या नाईक यांनी व्यापारी, दुकानदारांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दबाव

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक व्यापाऱ्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दबाव टाकत आहेत. वयाने जेष्ठ असणा-या व्यापाऱ्याला वैभव नाईक यांनी दमदाटी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते देखील व्यापा-याच्या अंगावर धावून जात आहेत.

महाराष्ट्र बंदमध्ये तिन्ही पक्ष ताकदीने सहभागी- संजय राऊत

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या बंदकडे देशाचं लक्ष लागलंय. बंदला पाठिंबा नाही असं कोणी राजकीय विधानं कोणी करत असेल तर त्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत का, शेतकऱ्यांचे देणं लागतो का हा प्रश्न स्वत:ला विचारावा, बंद मोडून काढू, रस्त्यावर येऊन दाखवा असं आव्हान कोणी देऊ नये. मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं, थार जीपगाडीने चिरडलं, अशी कोणती गाडी मुंबईत, महाराष्ट्रात असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, बंद चांगला आहे, तिन्ही पक्ष ताकदीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. किरकोळ घटना घडतात, त्या जगभरात बंदमध्ये होत असतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

विरोधाचे किडे वळवळत असतात, हा शेतकऱ्यांसाठी बंद आहे, शेतकऱ्याने पिकवलं नाही तर जे बस गाड्या काढा म्हणत आहेत ते उपाशी मरतील, शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

(Shivsena MLA Vaibhav Naik pressures traders to close shops forcibly Maharashtra kankavli bandh)

हे ही वाचा :

Mumbai Bandh | दादरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त, मुख्य मार्केटही बंद

Sandeep Deshpande | कृषी कायदे पास होत असताना मविआ खासदार शेपूट घालून का बसले होते : संदीप देशपांडे

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.