महाराष्ट्रात 5 कोटी लोकांनी मतदान केले, मग 7 कोटींपेक्षा जास्त मतमोजणी कशी? संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले ईव्हीएमला गर्भ ….

’ईव्हीएम’वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण महाराष्ट्रात इतके दळभद्री निकाल लागूच शकत नाहीत!", असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात 5 कोटी लोकांनी मतदान केले, मग 7 कोटींपेक्षा जास्त मतमोजणी कशी? संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले ईव्हीएमला गर्भ ....
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 8:43 AM

Sanjay Raut Allegation EVM Counting : “लोकसभेपेक्षा ही निवडणूक अधिक संघर्षाची आहे हे मान्य करून विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. पण निवडणूक यंत्रणाच विकली गेली. झालेल्या मतदानापेक्षा काही लाख मते जास्त मोजली गेली. त्यामुळे निकाल फिरला. विधानसभेच्या निकालानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण नाही. फडणवीस – शिंदे कसे जिंकले? हा प्रश्न जनतेला पडला आहे. विजयाला शंभर बाप असतात. पराभव बेवारस ठरतो. महाराष्ट्रातील निकालानंतर एक गूढ आणि भयाण शांतता पसरली आहे. कुठे उत्सव नाही, जल्लोष नाही. जणू जनतेच्या मनाविरुद्ध निकाल लागले. ’ईव्हीएम’वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण महाराष्ट्रात इतके दळभद्री निकाल लागूच शकत नाहीत!”, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांनी ईव्हीएमवर आणि महाराष्ट्राच्या निकालावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ईव्हीएमबद्दल काही गंभीर मुद्देही उपस्थितीत केले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झाले तेव्हा महाराष्ट्रात 5 कोटी 70 लाख लोकांनी मतदान केले होते. 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली तेव्हा 7 कोटी 70 लाख मते मोजली गेली. हे ’वरचे’ 2 कोटी मतदान आले कोठून? हे इतके मतदान वाढले कसे? ईव्हीएमला गर्भ राहिला काय? असे गंभीर सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

रोखठोकमधील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात लागलेल्या आश्चर्यकारक निकालांवर चर्चा करणे म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखे आहे. ”मोदी-शहा दिल्लीत सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणुका लढवायला नकोत,” यावर आता सगळ्यांचेच एकमत होत आहे. निष्पक्ष निवडणुकांचा काळ संपला आहे हे भाजपच्या राजकारणास विरोध करणाऱ्या पक्षांनी समजून घेतले पाहिजे. 23 तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीस पोस्टल बॅलट (मतपत्रिका) मोजण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात 138 मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. सामना बरोबरीचा होता. 9 वाजता महायुती व महाविकास आघाडीत प्रत्येकी 137 जागांवर आघाडी दाखवत होते. बरोबर 10 वाजता आकडे बदलले. महाविकास आघाडी फक्त 53 व महायुती 211 असे उलटफेर झाले. निवडणुकांत हार-जीत होत असते. लोकशाहीचे हेच खरे स्वरूप आहे, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात जे घडले ती लोकशाहीची सरळ सरळ हत्याच आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार यांनी दोनशेच्या वर जागा जिंकल्या. या ’ईव्हीएम’ निकालावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही. ’ईव्हीएम’ हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप आहे. हा शाप भारताचे अस्तित्वच नष्ट करेल की काय? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

जोपर्यंत ईव्हीएम हटवून बॅलट पेपरवर निवडणुकांची सुरुवात होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राप्रमाणे लोकशाहीची हत्या होतच राहील. अमेरिका, इंग्लंडसारखे आधुनिक सुधारणावादी देशदेखील त्यांच्या निवडणुकांत ईव्हीएमचा वापर करत नाहीत. अमेरिकेत एलन मस्क याने वारंवार जाहीर केले, ईव्हीएम हा जम्बो घोटाळा असून सर्व ईव्हीएम एकाच वेळी हॅक करून हवे तसे मतदान करून घेता येते. मस्कपासून अमेरिका, युरोपसारखी राष्ट्रे मूर्ख व भारतात मोदी-शहा व त्यांचा भाजप तेवढा शहाणा! महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यानंतर देशातील निवडणूक प्रक्रियेवर कोणाचा विश्वास राहील असे वाटत नाही. त्याच ईव्हीएमची वकिली आता सुप्रीम कोर्ट करत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.

महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत कसे बदल झाले? त्या आकडय़ांच्या जंतर मंतरवरही दुर्लक्ष करून चालणार नाही. 20 तारखेला 5 वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के होती. त्यानंतर रात्री 11.30 वाजता ती टक्केवारी 65.02 टक्के झाली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदानाची टक्केवारी 68.05 टक्के झाली. हे इतके मतदान वाढले कसे? ईव्हीएमला गर्भ राहिला काय? असेही संजय राऊत म्हणाले.

'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.