Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन कोटींची जमीन घेतली अन् ५० कोटीला विकली…संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Eknath Shinde: नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नाशिकमधील बिल्डर ठक्कर, ननवाणी आणि शाह यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केला आहे.

दोन कोटींची जमीन घेतली अन् ५० कोटीला विकली...संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
sanjay raut
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:11 AM

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. नाशिकमधील बिल्डर ठक्कर, ननवाणी आणि शाह यांच्यासह इतरांनी हा भूसंपादन घोटाळा केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत दोन दिवसांपूर्वी हे बिल्डर नाशिकमध्ये मांडीला मांडी लावून बसले होते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. यामधील ठक्कर बिल्डर यांनी दोन कोटींची जमीन घेऊन नाशिक महानगरपालिकेला ५० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप राऊत यांनी केला.

ठक्कर बिल्डर सर्वात मोठे लाभार्थी, राऊत यांचा आरोप

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नाशिक मनपातील घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले. नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले होते. या शहरातच ८०० कोटींची भूसंपादन घोटाळा बिल्डर लॉबीकडून झाला आहे. त्यात नाशिक मनपाची फसवणूक झाली आहे. या बिल्डर लॉबीने शेतकरी नसताना शेत जमीन घेतली आहे. सरकारची स्टॅप ड्यूटी डुबवली आहे. या बिल्डर लॉबीत ठक्कर बिल्डर हे सर्वात मोठे लाभार्थी आहेत. त्यांना ३५३ कोटींचा लाभ झाला आहे. ननवाणी आणि शाह यांनाही कोट्यवधींचा लाभ झाला आहे.

२ कोटींची जमीन, ५० कोटीला विकली

ठक्कर यांनी २ कोटींची जमीन विकत घेतली आणि मनपाला ५० कोटीला विकली. त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा आपल्याकडे आहे. ठक्कर, ननवाणी आणि शाह यांना कोट्यवधींचा लाभ झाला आहे. तसेच यामध्ये इतर बिल्डर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात लाभार्थी आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आले असताना मुख्यमंत्र्यांच्या शेजारी हे बिल्डर बसले होते. आता या प्रकरणाची तक्रार ईडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.

हे सुद्धा वाचा

एसआयटी स्थापन करावी

शेतकरी असल्याचे दाखवून या बिल्डरांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी, गुन्हे दाखल करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता हे गुन्हे दाखल झाले नाही तर आमचे सरकार आल्यावर ८०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपींना मनी लॉन्ड्रींगच्या गुन्ह्याखाली तुरुंगात जाणार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद.
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल.
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?.
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.