Chandrakant Patil : ‘हा रंग बदलणारा सरपटणारा प्राणी’, शिवसेना आमदाराचे खडसेंबद्दल जिव्हारी लागणारे शब्द
Chandrakant Patil : लोकसभा निवडणुका होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला, तरी अजून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होऊ शकलेला नाही. एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे लवकरच एकनाथ खडसे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे. एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव राहिला आहे.
मागच्या अनेक महिन्यांपासून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. एकनाथ खडसे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यांनी मंत्रिपद, विरोधी पक्षनेते पद भूषवलं आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी भाजपात प्रवेशाचे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय. पण अजून एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाहीय. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून स्वगृही परतण्याचे संकेत दिले होते.
एकनाथ खडसे यांनी त्यांचा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला. परंतु त्यांनी अजून राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडे राष्ट्रवादीमध्येच थांबण्याचा पर्याय आहे. पुढच्या दोन दिवसात ते भूमिका स्पष्ट करतील अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपाच केंद्रीय नेतृत्व अनुकूल असलं तरी, राज्यातील नेत्यांचा मात्र त्यांना विरोध दिसतोय. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा प्रवेश रखडलेला आहे.
‘खडसे म्हणजे सोयीच राजकारण करणारे’
दरम्यान एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणतील कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत’ अशी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता खडसेंवर टीका केली. “खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये. एकनाथ खडसे हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे आहेत” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. “चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. 30 वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही. खडसे म्हणतात, आज मी भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये. आधी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे खडसे आहेत” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.